विडूळ येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.
विडूळ येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
उमरखेड : –
विडूळ येथील वैभव उर्फ शिवा विलास धनगर वय वर्ष 20 याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले
काल गुरुवार दिनांक 28 रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान वैभवने विडूळ येथील नवी आबादी स्थित त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची त्याच्या घरच्यांना समजताच स्थानिक पोलीस पाटील गजानन मुलंगे यांना माहिती देण्यात आली त्यांनी लगेच पोलीस स्टेशन उमरखेड ला घटनेची माहिती दिल्यानंतर उमरखेड पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
वैभवच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसून पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चापाईतकर, बीट जमादार रोशन सरनाईक करीत असून वैभव च्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .