माणुसकी जपणे हेच माणसाचे प्रथम कर्तव्य- डॉ. विजय माने पुरोगामी युवा ब्रिगेड चा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराचे झाले वितरण.
माणुसकी जपणे हेच माणसाचे प्रथम कर्तव्य-
डॉ. विजय माने
पुरोगामी युवा ब्रिगेड चा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा
सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराचे झाले वितरण
उमरखेड /प्रतिनिधी: पुरोगामी युवा ब्रिगेडचा तृतीय वर्धापन दिन काल दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीराम मंगल कार्यालय, उमरखेड येथे पार पडला. यावेळी संविधान दिवस व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिन निमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्कार देऊन तालुक्यातील विविध क्षेत्रातील 15 मान्यवरांचा गौरव यावेळी करण्यात आला.तसेच यावेळी पुरोगामी च्या झेंड्याचे व एस बाउन्सर सर्व्हिस चे उदघाटन करण्यात आले.
अल्पावधीतच उमरखेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पायामुळे रोवणाऱ्या पुरोगामी युवा ब्रिगेड चा तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरोगामी युवा ब्रिगेड व भाऊसाहेब माने गौरव कृती समिती तर्फे सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. तालुक्यातील विविध क्षेत्रात योगदान असणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. पुरस्कारासाठी 15 व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात आली होती.
यावेळी तालुक्यातील 15 स्वर्गीय महानुभाव यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार वाटप करण्यात आले होते. यामध्ये स्व . रामचंद्र शिंगणकर स्व. जेठमलजी माहेश्वरी स्व. देवराव पाटील चोंढीकर स्व. विठलराव देशमुख स्व. वामनराव उत्तरवार स्व. गुलाबसिंग ठाकुर स्व. अमानुल्ला जाहागिरदार स्व. बंकटलाल भुतडा स्व. नारायणराव शिलार स्व. नारायणराव वानखेडे स्व. सखाराम नरवाडे गुरुजी स्व. सखाराम मुडे गुरुजी स्व. भाई देवसरकर स्व. गुणवंतराव देशमुख स्व. नानासाहेब देशमुख
यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी विचार मंचावर उदघाटक म्हणून अतुल भुईखेडकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजयराव माने उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर ऍड संतोष जैन,नितिन माहेश्वरी, डॉ. वि . ना . कदम,निधि ताई भुतडा,अश्विनी ताई पाटील चोंढीकर
,प्रा वृशालीताई देशमुख, कृष्ण गोपाल उतरवार,
सुभाषराव देशमुख,सुरेद्र कोडगीरवार
अशोक वानखेडे
सतिश दर्शनवाड
सुरेश कदम
अशोक शिरफुल
शिवशंकर सुरोशे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहरुख पठाण यांनी केले तर संचालन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष पंकज दिपके यांनी मानले. कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.
चौकट :
“महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मुर्ती दिना निमित्त या भागातील जुन्या पिढीतील सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्कार मूर्तीचा गौरव करण्यात आला. या महान मंडळी चे स्मृती जागरूक ठेवण्या साठी आपण सर्व त्यांची प्रेरणा घ्यावी आणि त्यांचे अनुयायी होऊन त्यांचे विचार जिवंत ठेऊन नवयुवकां मध्ये चेतना निर्माण व्हावी हा यामागील उद्देश होता”
डॉ .विजयराव माने