50 पेक्षा अधिक केस मध्ये सरकारची बाजू ठामपणे मांडणारे – अँड श्रीनिवास नाईक

50 पेक्षा अधिक केस मध्ये सरकारची बाजू ठामपणे मांडणारे अँड.श्रीनिवास नाईक
उमरखेड प्रतिनिधी :
शासकीय विश्रामगृह येथे विशेष सहाय्यक सरकारी वकील अँड श्रीनिवास नाईक यांचा सत्कार वकील संघाच्या वतीने करण्यात आला.
2010 पासून विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून सरकारची बाजू ठामपणे मांडणारे अँड. श्रीनिवास नाईक यांनी आज पर्यंत 50 पेक्षा अधिक केसेस निकाली लावण्याचा काम यांच्या हातून घडले अँड नाईक हे अतिदुर्गम भागातील उमरखेड तालुक्यातील चिखली ( वन ) बंदी भागातून शिक्षण घेऊन 2001 साली वकिली व्यवसायात आले नंतर 2010 पासून विशेष सहाय्यक सरकारी वकील म्हणून तर आज पर्यंत कार्यरत आहेत अँड श्रीनिवास नाईक यांची कार्याची पावती म्हणून येथील वकील संघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अँड आर . आर . पांडे होते प्रमुख उपस्थिती म्हणून अँड संजय जाधव हे होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल भराडे यांनी केले तर आभारप्रदर्शन अँड विशाल कोत्तेवार यांनी केले कार्यक्रमात मनोगत अँड संजय डोळस , अँड शिवम कापसे , अँड गोपाल कन्हाळे यांनी व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात अँड आर . पांडे यांनी न्यायालीन कामात उलट तपास घेणे सोपे परंतु सरतपास म्हणजे साक्षदाराकडून वदवून घेणे कठीण असते असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमास वकील संघाचे उपाध्यक्ष विशाल रुडे ,सचिव अँड निरंजन कदम, कोषाध्यक्ष अँड कैलास सावतकर, अँड मुनेश्वर, अँड अरमान शेख , अँड निरंजन दवणे अँड रतन चव्हाण, अँड गजेंद्र चंद्रे, अँड शरद कलाने, अँड वैभव डांगे, अँड महेश वानखेडे, अँड भूषण देवसरकर आदी
एडवोकेट श्रीनिवास नाईक सरकारी वकील यांच्यामुळे एक समाजामध्ये एक सगळ्या पर्यंत चांगला संदेश पोहोचण्यात आलेला आहे व सगळ्या स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे वकील संघाचे मंडळी कार्यक्रमात उपस्थित होते
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/it/register-person?ref=PORL8W0Z