अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने 5 जणांच्या आमरण उपोषणाची 12 व्या दिवशी सांगता कमलबाई गाडगे व दिव्यांग संतोष आलट यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या उपस्थीतीत उपोषण सोडले.

youtube

अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने 5 जणांच्या आमरण उपोषणाची 12 व्या दिवशी सांगता

कमलबाई गाडगे व दिव्यांग संतोष आलट यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी राठोड यांच्या उपस्थीतीत उपोषण सोडले

प्रशासनाची दमछाक ; तगडा बंदोबस्त
उमरखेड –

मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे , सराटी आंतरवाली येथे पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांप्रमाणे उमरखेड महागाव पुसद या तीन तालुक्यांचा शुद्धीपत्रक काढून जीआर मध्ये समावेश करावा या प्रमुख मागण्यांसाठी दि . 5 सप्टेंबरपासून सचिन घाडगे , गोपाल कलाणे, सुदर्शन जाधव , शिवाजी पवार , शरद मगर यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाची सांगता उपविभागिय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्या लेखी पत्राने करण्यात आली . उपोषण कर्त्यांच्या मागणीनुसार उमरखेड महागाव पुसद या तीन तालुक्यांचा समावेश मराठवाडयातील 8 जिल्ह्यांप्रमाणे जीआर मध्ये शुद्धीपत्रक काढून समावेश करावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याने उपोषण कर्त्यांचे समाधान झाले . यावेळी सराटी आंतरवली येथून मनोज जरांगे पाटील यांनी भ
भ्रमणध्वनी वरुन व्हिडीओ कॉल व्दारे उपोषण कर्त्यांशी संवाद साधला तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे कट्टर आंदोलक दत्ता पाटील हडसनकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती . दिव्यांग बांधव संतोष आलट व उपोषणकर्त्यांचे आई कमल घाडगे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक विनायक कोते , – ठाणेदार शंकर पांचाळ उपस्थित होते .
मागील ५ सप्टेंबर पासुन उमरखेड मध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शासनाचा निषेध नोंदवित आणि जालना सरावली – सराटी भागातील संविधानात्मक सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलीसांनी अमानुष पणे लाठीचार्ज करून शाळकरी – वृद्धांना तसेच महिलांना मारहान रक्तबंबाळ करून डोक्यात छेरे घातले , आशृधुराच्या कांड्या फोडल्या या निषेधार्थ पाच समाज बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे तेव्हा १६ सप्टेंबर रोजी मतखंडातील बोरी , मानकेश्वर , कोपरा , ब्राम्हणगांव , परजना या सह अनेक गांवातुन समर्थन दर्शविन्या साठी ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकारचा निषेध करित मोर्चा छपत्रती शिवाजी महाराज चौकातून तहसिल प्रागणांत हा सर्वाचा मोठ्या संख्येचा समाजबांधवाचा मोर्चा धडकला
५ सप्टेंबर पासुन उपोषनार्थी सचिन घाडगे , शिवाजी पवार , सुदर्शन जाधव , गोपाल कलाने आणि शरद मगर या समाज युवकांनी तहसिल समोर अन्न त्याग करित आरक्षण मिळण्यासाठी बेमुद उपोषण तहसिल कार्यालय समोर प्रारंभ केले होतो शासनाने ४० दिवस मुदत दिल्याने राज्याचे मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस , अजित पवार सर्व सहकारी मंत्री मंडळावर विश्वास दर्शवित आज सर्व समाज बांधवांना विश्वासात घेत विचारांतुन उपोषण कर्त्यांच्या यांच्या मातोश्री कमलबाई दतात्रय घाडगे , अंपग व्यक्ती संतोष आलट यांच्या हस्ते पांचहि जनांनी शरबत घेऊन उपोषण सोडले

या वेळी उपविभागिय अधिकारी डॉ व्यंकट राठोड , समन्वय समिती पदाधिकारी सरोज देशमुख , स्वप्नील कनवाळे , प्रमोद देशमुख , भिमराव पाटिल चंद्रवंशी , , संदिप घाडगे , ॲड शिवाजी वानखेडे , बळीराम मुटकुळे , राजु जयस्वाल , रमेश चव्हाण , प्रेमराव वानखेडे , प्रदिप देवसरकर , किशोर भवरे , संदिप ठाकरे , गणराज कदम , अमोल पंतीगराव , सुर्यकांत पंडीत , शिवाजी माने , गजानन सुरोशे , सविता कदम , वर्षा देवसरकर , संगीता वानखेडे , या सह शेकडोवर समाजातील पुरुष – महिला , मुली – मुले प्रामुख्याने उपस्थित होते.सकल मराठा समाज बांधव उपस्थितीत होता.

चौकट “
सरकारने ओबीसी मर्यादा वाढवून महाराष्ट्रतील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे . सरकारने 40 दिवसांत निर्णय घ्यावा सरकारला आही 40 दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत .
संदिप घाडगे
समन्वयक मराठा क्रांती मोर्चा उमरखेड

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!