जेवली येथे अग्नीतांडव ! पाच घराला भीषण आग [वासरे आणि बकऱ्या आगीत भस्मसात.]
जेवली येथे अग्नीतांडव ! पाच घराला भीषण आग
[वासरे आणि बकऱ्या आगीत भस्मसात.]
जेवली
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पैनगंगा अभयारण्यातील जेवली गावी दुपारी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आणि विझवता विझवता पाच घराला घेरावा घातला.
ग्रामीण भागात नागरिक मोठ्या प्रमाणात आज गहू, हरभरा काढणीस आला, त्यामुळे गावखेड्यातील नागरिक काढणीस शेतात गेले होते. गावात आगीचे लोट दूरवरून दिसत होते. रानावनात गेलेले लोक गावाच्या दिशेने आग विझवन्या साठी पळत सुटले. आणी आग विझवन्याचा प्रयत्न करू लागले. जेवली गावाला आग लागल्याची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार प्रेम केदार, बिट जमादार विद्या राठोड, पोलीस कर्मचारी दत्ता कवडेकर यांनी त्वरित आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन, उमरखेड नगरपालिकेची अग्निशामक यंत्राला बोलवण्यात आले.
आगीने रुद्र रूप धारण केल्याने सींमा धोतरे, दत्ता धोतरे, संतोष धोतरे, लक्ष्मण धोतरे, सींना काळे, दत्ता सोनुले यांच्या घराला आग लागल्याने, घरातील संसार उपोयोगी साहित्य आगीत स्वाहा झाले. यात गायीचे ६ वासरे, शेळीचे ७ पिले जळून मृत्यू मुखी पडले.
आगीत अंदाजे १० लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसून येत होते.
आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला आजची रात्र उघड्यावर संसार मांडावा लागणार, आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला त्वरित शासकीय मदत मिळण्याची मागणी जेवली गावचे सरपंच भेरलाल साबळे यांनी केली.
या घटनेची वार्ता कळताच ढाणकी भाजपचे शहराध्यक्ष महेश पिंपरवार यांनी जेवली कडे धाव घेतली. आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित मंडळाधिकारी यांना संपर्क साधून, नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता सुचना दिली.