ऐ आय एम आय एम कडुन मराठा आरक्षण बेमुदत आमरण उपोषणाला जाहिर पांठिबा.
ऐ आय एम आय एम कडुन मराठा आरक्षण बेमुदत आमरण उपोषणाला जाहिर पांठिबा
उमरखेड .
जालना येथील अंतरवाली सराटी येथे जो काही महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला मराठा आरक्षणाला संदर्भात बसलेल्या नागरिकांवर बेदम मारहाण केले .हि घटना अतिशय निदनीय आहे. समस्त मराठा समाज यांना आरक्षण मिळण्याकरिता संवैधानिक व कायदेशीर मार्गाने न्यायिक मागणी लावून मागील कित्येक वर्षापासून आंदोलन, निदर्शने, धरणे उपोषण करीत आहेत
मागील 40 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित असून सद्यस्थितीत मराठा समाज आर्थिक शैक्षणिक अवस्था अत्यंत बिकट झाली असून आता मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक व शैक्षणिक संधी न मिळाल्यास मराठा समाजास दुर्बलतेच्या खालील लोटल्या जाईल. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपासून तहसील प्रांगण येथे सचिन गाडगे, गोपाल कलाने ,सुदर्शन जाधव, शिवाजी पवार हे चार मावळे आमरण उपोषणास बसले त्यांना जाहीर पांठिबा देताना ऐ -आय- एम -आय -एम चे युवा जिल्हा अध्यक्ष अजु वजाहत अली खान ,तालुका अध्यक्ष एजाज खान , ता.कार्यकारी अध्यक्ष अहमेद पटेल , सज्जाद खान ,अखील कुरेशी ,शेख असलम,उबेद मुजाबर, शेख मतीन,परवेज अहेमद,काजी अन्सार व सर्व त्यांच्या टिम ने जाहीर पांठिबा दिले. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला जाहीर पांठिबा असे ऐ -आय -एम -आय -एम- ने सागितले
यावेळी सकल मराठा समाज बांधव भगीनी उपस्थित होते