ऑल इंडिया तन्जीम -ए- इंसाफ हदगाव कार्यकारिणी जाहीर.
![](https://narishaktinews.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210530-WA0309-1024x497.jpg)
ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ हदगाव कार्यकारणी जाहीर
हदगाव..
सामाजि क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी सामाजिक संघटना तन्जीम ए इन्साफच्या हदगाव तालुक्यातील व शहरातील नूतन कार्यकारिणी आज रोजी छोटेखाणी कार्यक्रम घेऊन जाहीर करण्यात आली असून यात तालुका प्रभारी फिरोज खान, तालुका समन्वयक शेख अहेमद, तालुका अध्यक्ष जमील अहेमद क़ाज़ी मोहम्मद यकीन कुरेशी, शहराध्यक्ष फयाज खान पठाण यांची सर्वांच्या सहमतीने निवड करण्यात आली आहे. ही निवड तन्जीम ए इन्साफ जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या हस्ते करण्यात आली. या निवडी प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मोईन कुरेशी, प्रा. जुबेर खान मार्गदर्शक, हाफिज शाहेदुल इस्लाम शहराध्यक्ष नांदेड व तालुक्यातील शहरातील ईतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मत मांडताना सांगितले की गेल्या नऊ वर्षापासून ही सामाजिक संघटना प्रत्येकांना येणाऱ्या अडचणी किंवा समस्या असो प्रशासनाचे जनजागृतीचे आव्हान असो लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहे. यावेळी इतर पदाधिकारी यांचे समयोचित भाषणे झाली. प्रस्तावना पत्रकार शेख जुनेद यांनी केले तर आभार पत्रकार शेख शहबाज यांनी मानले. या वेळी फिरोज पटेल, शेख जावेद, शेख बबलू, शेख फयाज, इसा कुरेशी, हाफिज जमिल सहाब, वसीम खान, मिर्झा मुजाहिद शेख आयुब शेख रजाकार वसीम खान पठाण उपस्थित होते.