अमृतेश्वर महादेव संस्थान भाविकांचे श्रद्धास्थान.

youtube

अमृतेश्वर महादेव संस्थान भाविकांचे श्रद्धास्थान

उमरखेड : –
शहरापासून सुमारे 12 कि मी अंतरावर ढाणकी मार्गावर असलेले ,शासनाकडून मान्यता प्राप्त झालेले ‘क ‘ दर्जाचे तिर्थक्षेत्र निसर्गाच्या कुशीतील मनोरम श्रीक्षेत्र हरदडा येथील पुरातन अमृतेश्वर महादेव मंदीर विदर्भ मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे .
उमरखेड तालुक्यातील शिवमंदीरांपैकी भाविकांच्या वर्दळीचे प्रमुख पुरातन हरदडा महादेव मंदीर येथे दरवर्षी श्रावण महिन्यात, महाशिवरात्री तसेच चैत्र महिन्यात 12 दिवस बारस यात्रेनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात . सध्या श्रावण मासात अधिक मास चालु असल्याने पारायण भजन किर्तनाने परिसर भक्तीमय झाला आहे . मंदिराच्या परिसरात भव्य सभागृह असल्याने उन्हाळा, हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतुमध्ये लग्न समारंभ पार पडतात . आसपास मनमोहक हिरव्याकंच माळरानामुळे व असलेल्या डेरेदार वट वृक्षांच्या सावलीने भाविकांचा आनंद व्दिगुणित होतो . भाविकांप्रमाणे राजकिय पक्षांच्या कार्यक्रमांचीही येथे रेलचेल असते . राजकिय पक्षांच्या निवडणूक प्रचारांचे नारळ अमृतेश्वराच्या साक्षीने फोडले जातात . पुराण काळात वर दिलेल्या राक्षसाने भगवान शंकरांना सळो की पळो करून सोडलेले असतांना भगवान शंकरांनी येथे दडा धरला त्यामुळेच ‘ हर ‘ म्हणजेच ‘ शिव ‘ व ‘दडा ‘ म्हणजे दडला . त्यामुळे या ठिकाणाला हरदडा असे नाव पडले . संकटात सापडलेल्या भगवान शंकराच्या मदतीला भगवान विष्णु वैकुंठातुन ‘साचल ‘ आले म्हणून जवळच असलेल्या धानोरा ( साचलदेव ) येथे पुरातन बालाजी मंदीर आहे . या वरून धानोरा (साचलदेव ) नावाने हे गाव ओळखले जाते . अशी अख्यायिका असल्याचे सांगण्यात येते . तालुक्यातील निसर्ग वैभवाची साक्ष असलेले हरदडा येथील अमृतेश्वर महादेव संस्थान विदर्भ – मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!