चातारी येथे गीतगायन महा स्पर्धा मध्ये बक्षीस पटकावणारे किनवटचे अंधगायक अनिल उमरे ठरले महानायक.

youtube

चातारी येथे राज्यस्तरीय गीतगायन महास्पर्धा संपन्न
पहिले बक्षीस पटकाऊन किनवटचे अंधगायक अनिल उमरे ठरले महागायक

प्रथम बक्षीस २००००रु अनिल उमरे, किनवट
द्वितीय बक्षीस १५०००रु राहूल भगत, नांदेड
तृतीय बक्षीस १००००रु गणेश राऊत, यवतमाळ
चौथे बक्षीस ७०००रु श्याम शिंदे, पांढरकवडा
पाचवे बक्षीस ६०००रु यश विनोद गायकवाड, पुसद

उमरखेड : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त उमरखेड तालुक्यातील चातारी येथे दि. १५ एप्रिल रोजी राज्यस्तरीय संगीतमय गीतगायन महास्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जवळपास दोन हजार लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या महास्पर्धेत किनवट तालुक्यातील सिंदगी (मोहपूर) येथील प्रज्ञाचक्षू गायक अनिल बाबाराव उमरे हे वीस हजार रुपयाचे पहिले पारितोषिक पटकावून महागायक ठरले.
या महास्पर्धेचे उद्घाटक ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकरराव रामजी वाठोरे, प्रमुख अतिथी चातारीच्या सरपंच रंजनाताई माने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गंगारामजी वाठोरे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या महास्पर्धेसाठी परिक्षक म्हणून नांदेड येथील कवी, गायक तथा प्रबोधनकार श्रीपती ढोले, भंडारा येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहूल भोरे, किनवट येथील महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी परीक्षण केले.
या महास्पर्धेतील प्रथम बक्षीस २००००रु अनिल उमरे किनवट, द्वितीय बक्षीस १५०००रु राहूल भगत नांदेड. तृतीय बक्षीस १००००रु गणेश राऊत यवतमाळ. चौथे बक्षीस ७०००रु श्याम शिंदे पांढरकवडा तर पाचवे बक्षीस ६०००रु यश विनोद गायकवाड, पुसद यांना मिळाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंजाब रणवीर सर यांनी तर सूत्रसंचालन भालचंद्र वाठोरे आणि कवी महेंद्र नरवाडे यांनी केले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक सचिन कांबळे व त्यांचा संच, हिमायतनगर यांनी सहभागी गायकांना हार्मोनियम, तबला, ढोल, बँजो, पॅड आणि ऑर्गन या साहित्यासह संगीतसाथ दिली.
स्पर्धेअंती लगेच बक्षीस दात्यांच्या हस्तेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महास्पर्धेचे बक्षीस पहिले बक्षीस शोभाताई सदाशिव वाठोरे, दुसरे बक्षीस विजय राघोजी पाईकराव, तिसरे बक्षीस उत्तमराव किसनराव वाठोरे, चौथे बक्षीस माधव सुदामराव वाठोरे तर पाचवे बक्षीस डॉ. पंडित काळुराम वाठोरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी वर्गणी देणाऱ्यांची यादी असणारा फ्लेक्स कार्यक्रम स्थळी लावण्यात आला होता. मंडपात दोन हजार खुर्च्या, आरओचे पाणी आणि सर्वांसाठी भोजन व्यवस्था केली होती. आमच्या गावातील या पहिल्या महास्पर्धेत २० जिल्ह्यातील ३२ तालुक्यातून ५० स्पर्धक सहभागी झाले होते, या पेक्षाही भव्य स्वरुपात पुढील वर्षीसुद्धा या महास्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे संयोजक विजय वाठोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव वाठोरे, कार्याध्यक्ष दीपक किसनराव वाठोरे, स्वागताध्यक्ष भास्कर बिदाजी वाठोरे, कोषाध्यक्ष पंजाब रणवीर, सचिव पुंडलिक सोनुले, सल्लागार वसंतराव वाठोरे, विष्णु पतिंगराव, भगवान साधु वाठोरे, कैलास गंगाराम रणवीर, दिपक तुकाराम वाठोरे, कचरु रामजी साळवे, सुरेश नामदेव वाठोरे, दिपक विठ्ठल वाठोरे, मारोती रमेश वाठोरे, गणेश चांदुजी रणवीर, सिद्धार्थ प्रकाश खिल्लारे, दिलीप रघुनाथ कांबळे, ग्रा.पं. सदस्य प्रदिप मधुकर वाठोरे, सिद्धार्थ पांडुरंग वाठोरे आदींसह अत्त दीप भव चॅरिटेबल ट्रस्ट चातारी, प्रशासुर्य चॅरिटेबल ट्रस्ट चातारी, लहुजी शक्ती सेना चातारी, संत भिमाभोई सामाजिक संघटना चातारी, डॉ. आंबेडकर स्टडी ग्रुप आणि चातारी येथील समस्त नागरीकांनी परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

1 thought on “चातारी येथे गीतगायन महा स्पर्धा मध्ये बक्षीस पटकावणारे किनवटचे अंधगायक अनिल उमरे ठरले महानायक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!