अनुप्रिता मोरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित.

youtube

अनुप्रिता मोरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित

लातूर (प्रतिनिधी):

राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर कडून दिला जाणारा राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार दिनांक २३ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन कार्यक्रमात अनुप्रिता जाईबाई मोरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दिला जातो. बीड येथील अनुप्रिता जाईबाई मोरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दलित, कष्टकरी आणि वंचितांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशासह साहित्य संमेलन, व्याख्याने-परिषदा आणि समाजोपयोगी काम केल्याची दखल घेत राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूरचे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी हा पुरस्कार दिल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 महिलांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आणि कौतुक यावेळी करण्यात आले. अनुप्रिता मोरे सह सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!