लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; नराधमास अटक

youtube

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; नराधमास अटक

उमरखेड प्रतिनिधी :- लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मुलगी गरोदर राहिली.

पोलीस स्टेशन पोफाळी अंतर्गत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा तिचा नातेवाईक असून दि .14/09/2023 रोजी दुपारी 12.00 वा. तिचे राहते घरी ती एकटी असतांना आरोपी घरी येऊन म्हणाला की, तुझे वय पूर्ण झाले की, आपण दोघे लग्न करू असे म्हणून आरोपी याने तीची इच्छा नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले व घरून निघून गेला. त्या नंतर ऑकटोबर 2023 मध्ये अल्पवयीन मुलीची मासिक पाळी येणे बंद झाली व दिवस राहिल्याचे लवकर लक्षात आले नाही. जानेवारी महिन्यात कळाले की ती गर्भावती आहे.त्यानंतर तीने ही सर्व माहिती तिच्या आई वडिलांना सांगितली.

दि.19/04/24 चे सकाळी 04/00 वा. चे सुमारास तीच्या पोटात वेदना होऊ लागण्याने आई वडिलांनी तिला कुटीर रुग्णालय उमरखेड येथे नेले डॉक्टरांनी उपचार केले असतात तीची प्रसूती केली दिवस पूर्ण न झाल्याने अल्पवयीन तीचे स्त्री जातींचे अर्भक दगावले असे डॉक्टरांनी सांगितले.पीडितेचे बयाणावरून पोलीस स्टेशन पोफाळी येथे अप क्र.- 127/24 कलम 376(2)(फ )भा. द. वी.सहकलम 4,6, बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोफाळी पोलिसांनी आरोपी ह्यास तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली असून पुढील तपास ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आशिष झिमटे व हिंमत बंडगर हे करीत आहेत.

Google Ad
Google Ad

1 thought on “लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; नराधमास अटक

  1. Thank you for the auspicious writeup It in fact was a amusement account it Look advanced to far added agreeable from you However how can we communicate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!