वसंत सहकारी साखर कारखाना च्या मागील अध्यक्ष व संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी पुन्हा चालु करण्याची सरकार कडे मागणी करणार आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती.

youtube

वसंत सहकारी साखर कारखाना च्या मागील अध्यक्ष व संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी पुन्हा चालु करण्याची सरकार कडे मागणी करणार

आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषद मध्ये माहिती

उमरखेड :- बंद अवस्थेत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकारी संचालकाच्या गैरकारभाराची व आर्थिक अफरातफरीची थांबलेली चौकशी ही दप्तर दिरंगाईमुळे लांबणीवर पडलेली कलम८३ अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी लवकरच मुख्यमंत्र्याकडे करणार असून दोषी असणाऱ्याना गजाआड केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत सांगीतले .
ते म्हणाले की , मागील ३ वर्षापासून वसंत बंद पडल्याने परिसरातील कास्तकारावर शोककळा पसरली होती. कारखाना सुरु व्हावा यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून माजी आमदार राजेंद्र नजरधने , विजयराव खडसे यांनी अटोकाट प्रयत्न केले त्याच धर्तीवर आम्ही शेतकरी हितासाठी प्रयत्न केला याही वेळेस सर्व राजकीय नेते मंडळी यांना सोबत घेतले . कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या न्यायालयातील याचिकेत त्यांनी हरकत घेतली नसल्याने न्यायालयाने आदेश पारित करित कारखाना सुरु होण्यासाठी हिरवी झेंडी दिली . त्यामुळे येणाऱ्या सिजनमध्ये कारखाना सुरु झाला पाहिजे तसेच पुढील वर्षी ४ लाख मेट्रीक टन गाळप होण्यासाठी कारखाना कुणीही घेवो त्यांना तालूक्यातील शेतकरी , ऊस उत्पादक , राजकीय पुढारी , समाजसेवक यांनी मदत केली पाहिजे असे आवाहन करीत , तरच कारखान्याचे गतवैभव प्राप्त होणार असल्याचे यावेळी आमदार ससाने यांनी सांगीतले . या पत्रपरिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा , जेष्ठ पदाधिकारी दत्तदिगंबर वानखेडे , बळवंत नाईक , अजय बेदरकर , बालाजी वानखेडे खरुसकर, योगेश वाजपेयी आदि उपस्थित होते .

चौकट :
कारखाना १५ वर्षासाठी भाडेतत्वावर जाणार ही बाब तालूक्यासाठीच न०हे तर ऊस उत्पादक असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ५ तालूक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे . मात्र या कारखान्यावर भ्रष्टाचार करून वाळवी लावुन ओस पाडणाऱ्या पापी तत्कालीन संचालक मंडळाची विनाविलंब ‘ ईडी ‘ विभागाकडे लवकरच प्रकरण सादर करणार

नितिन भुतडा

भाजपा जिल्हाध्यक्ष

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!