हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला.

youtube

हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला.

मुळावा गावात दहशतीचे वातावरण

मुळावा दि . १०

स्थानिक पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे मुळावा येथील हॉटेल गुरूदत्तचे मालक श्याम मोहन श्यामसुंदर यांना हॉटेलची उधारी मागीतल्या कारणाने प्राणघातक हल्ला करुन जबर जखमी केले . या बाबत सवीस्तर वृत्त असे की दी . 09 सप्टेबर रोजी सायंकाळी 06 वा . च्या दरम्यान जखमीचा मुलगा प्रथमेश श्यामसुंदर याने गावातील चार तरूणाना हॉटेलच्या उधारीचे पैसेे मागीतल्या कारणावरून उधारीचे पैसे का मागीतले म्हणुन जखमी श्याम मोहन श्यामसुंदर यांना तूला पाहुन घेतो असे बोलुन निघुन गेले . या घटनेनंतर रात्रीच्या साडेनऊ च्या सुमारास श्यामा श्यामसुंदर आपले दुकान बंद करत असतांना चार तरूण हातामध्ये रॉड, लाकडी काठ्या, व दांडके घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, तोंडावर, व शरीरावर मारहान करून जबर जखमी केले सदर घटनेची माहीती मिळताच जखमी च्या पत्नीने आरडा ओरडा करताच घटनास्थळावरील नागरीकाच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सदरील जखमीस उमरखेड येथील शासकीय रूग्नालयात नेले डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमीला लाईफ लाईन हॉस्पीटल येथे ॲडमीट केले . तेथे उपचारादरम्यान प्रकृती खालावल्या कारणाने तात्काळ रुग्नवाहीका करून नांदेड येथे ग्लोबल हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले वृत्तलीहे पर्यत जखमीची प्रकृती गंभीर असून पुढील उपचार सुरु आहेत . सदर घटनेची रितसर तक्रार जखमीच्या पत्नी दुर्गाताई श्यामसुंदर यांनी पोलीस स्टेशन पोफाळी येथे लेखी तक्रार दिली, या घटनेची तात्काळ दखल घेत पोफाळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजीव हाके आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेतील एका तरुणास ताब्यात घेण्यात आले . सदरील घटनेत चार आरोपी विरोधी कलम ३०७,५०४,५०६, ३४ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस स्टेशन पोफाळी करीत आहेत .

महत्वाची टिप

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून अशा घटनाना आवर घालावा, एैन सण समारंभाच्या तोंडावर अशा घटना वारंवार घडु नये म्हणुन आरोपीवर कठोर कारवाही व्हावी अशी मागनी सर्वसामान्य जनतेतुन होत आहे . तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी म्हणून रात्रीला मुळावा चौकी येथे कायम स्वरूपी दोन कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागनी आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!