बाळदी रोड झाला खड्डेमय रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था.
बाळदी रोड झाला खड्डेमय.
उमरखेड(प्रतिनिधी)
बाळदी गावचा रस्ता हा खुप खड्डेमय अवस्थेत सध्या झाला आहे,रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे,रस्त्या वरील मध्य भागातील डांबर उखळले,गिट्टी बाहेर निघाली व रस्त्याच्या मधोमध,मोठं मोठे खड्डे पडले, त्यामुळे मोटर सायकल,व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे बऱ्याच नागरिकांना, कमरेचा व मनक्याचा आजाराने, भयंकर त्रस्त झालेत,
रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांचा अपघात होण्याची संभावना आहे.
वाहन धारकांना जीव मुठीत धरून वाहन चालावे, लागते,
तरी संबधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन,आम्हाला रस्ता करून दयावा,अशी विनंती बाळदी येथील नागरिकांनी केली.
I like this web blog very much, Its a real nice position to read and incur info.Raise blog range