बळीराजाची भव्य मिरवणूक व बळीराजा पुरस्कार सोहळा संपन्न उमरखेड –
बळीराजाची भव्य मिरवणूक व बळीराजा पुरस्कार सोहळा संपन्न
उमरखेड –
प्रतिनिधी
उमरखेड : शहरात बळीराजा महोत्सव समितीच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी सिंधू संस्कृतीचा पुरस्कर्ता कृषी सम्राट बळीराजाची भव्य गौरव मिरवणूक व शेती आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गौरविण्यात आले . कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघालेली ही मिरवणूक माहेश्वरी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक ,खडकपुरा, सोनार लाईन, नाक चौक अशा पद्धतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या मिरवणुकीचे सभेमध्ये रूपांतर झाले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुधीर भाऊ देशमुख सेवानिवृत्त नायब तहसीलदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश थोटे, बाळासाहेब रास्ते पाटील, गंगाराम हुंबे, सरोज देशमुख, संतोष गवळी, अंकुश रास्ते पाटील, सुरेश कदम सौ . देवसरकर व ज्यांच्या हस्ते बळीराजा गौरव सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आला ते ज्येष्ठ शेतकरी चंपती वानखेडे व गोदावरी वानखेडे कोपरेकर, बंडू पाटील कदम माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हे होते
यावेळी सुरेश कदम चालगणी, मनोहर वानखेडे धानोरा, प्रियंका चौधरी , विठ्ठल पतंगराव अंबोडा ,परसराम मुडे निगनूर, अनिल जाधव टाकळी ,अनिल गोबे बेलखेड ,बाळकृष्ण देवसरकर देवसरी या शेतकऱ्याचा बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले महासम्राट बळीराजा अत्यंत विद्वान दयाळू तत्ववेता व जनकल्याणकारी राजा होता त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण केला शेतकरी कारागीर आणि आदिवासी यांचा तो सखा आणि आदर्श होता बळीराजाचे शत्रूही मानतात की बळीराजा हा अत्यंत उदार होता म्हणून भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाला ओवाळते व म्हणते ” इडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे”आपला इतिहास आपण विसरलो म्हणून कसलाच स्वाभिमान राहिले राहिला नाही स्वाभिमान नसल्याने प्रगती नाही हे त्रिवार सत्य आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकांमध्ये सण १९७३ साली सहाव्या अध्यायामध्ये महासम्राट बळीराजाला शोधणारे पहिली इतिहास संशोधन केले होते महासम्राट बळीराजा हे कुळस्वामी आहेत व छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत असे महात्मा ज्योतिराव फुले हे महासम्राट बळीराजाला शोधणारे पहिली इतिहास संशोधक आहेत महासम्राट बळीराजा हे कुळस्वामी आहेत व छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आहेत असे महात्मा ज्योतिराव फुले अभिमानीने सांगतात व लिहितात या दोन्ही महामानवाला शोधणारे महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले इतिहास संशोधक आहेत असे विचार बाळासाहेब रास्ते पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले या कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे यांनी प्रास्ताविक देवानंद मोरे तर आभार बालाजी वानखेडे यांनी मानले या कार्यक्रमाला परिसर राहतील मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते.