न्यू जय माता दी दुर्गा उत्सव मंडळाकडून रक्तदान शिबिर संपन्न
न्यू जय माता दि दुर्गोत्सव मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
ता. प्रतिनिधी उमरखेड:-
न्यू जय माता दि दुर्गोत्सव मंडळ सिद्धेश्वर वॉर्ड, बोरबन उमरखेड या दुर्गोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी राखत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 15 ऑक्टोबर शुक्रवारला देवीच्या मंडपात करण्यात आले होते. सदर शिबिरास मैत्री परिवाराचे मोलाचे सहकार्य मिळाले त्यांनी सर्व रक्तदात्याचे रक्त गोळा करून घेतले. मिरवणूक,डीजे व अवांतर खर्चाला फाटा देत या उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महिलांनी सुध्दा स्वइच्छेने या शिबिरात सहभाग घेतला. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना 5 लाखाचा अपघाती विमा देण्यात आला .
या शिबिराचे उद्घाटन उमरखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. अमोल माळवे साहेब यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.दत्ता गंगासागर साहेब , नगरसेवक गजेंद्र ठाकरे ,अॅड. संजय कुमार जाधव ,बिट जमादार रोशन सरनाईक, संजय साळुंखे, उमरखेड आगार प्रमुख प्रकाश भदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक पोलिस निरीक्षक माळवे साहेब यांनी केले. असेच उपक्रम सर्व मंडळांनी राबविले व सामाजिक बांधिलकी जोपासली तर आमच्या खात्यावरील ताण कमी होईल,नेहमीच पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी राहून जोमाने काम करेल असे उदगार काढले.गंगासागर साहेब यांनी रक्तदानाचे महत्व व्यक्त केले व रक्तदान हे महादान, श्रेष्ठ दान आहे असे उदगार काढले.
कार्यक्रमाचे संचालन गजानन पाचकोरे यांनी केले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. तसेच या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.