बसंवाडा विधानसभा क्षेत्रात विजय निश्चित करू निरीक्षकपदी नियुक्तीच्या वेळी डॉ.प्रा.मिनाक्षि सावळकर यांची ग्वाही.
बसंवाडा विधानसभा क्षेत्रात विजय निश्चित करू
निरीक्षकपदी नियुक्तीच्या वेळी डॉ.प्रा.मिनाक्षि सावळकर यांची ग्वाही
यवतमाळ दि.4 नोव्हेंबर-: देशातील चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून तेलंगाना प्रदेशात विधानसभा बंसवाडा निरीक्षक पदी यवतमाळच्या काँग्रेसच्या राज्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग डॉ.प्रा.मीनाक्षी सावळकर यांची नियुक्ती करण्यात आली.राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण विचारात घेऊनच सामाजिक कार्य करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली या जबाबदारीचे पालन करून काँग्रेसच्या बसंवाडा विधानसभा क्षेत्रात विजय निश्चित करू अशी ग्वाही निरीक्षकपदी नियुक्तीच्या वेळी डॉ.प्रा.मिनाक्षी सावळकर यांनी दिली.
तसेच संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस पक्षासाठी चांगले दिवस आणु असा विश्वास व्यक्त केला तसेच मी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पडेल पक्षाचे पुढील चांगले दिवस येण्यासाठी प्रसार माध्यमाची भूमिका महत्त्वाची असल्याचे तेलंगाना प्रदेशातील बसंवाडा विधानसभा मतदारसंघात आपण काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी जात असून सोबत यवतमाळ जिल्ह्यातील काही महिला व सहकारी सोबत घेऊन जाणार आहे.तेलंगाना विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षातून निरीक्षक पदासाठी जिल्ह्याचे सन्माननीय आमचे नेते माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तेलंगाना प्रदेशातील सर्व विधानसभा लढवत असून काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासाठी व काँग्रेस पक्षाची बांधिलकी म्हणून आणि काँग्रेस पक्षातील जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी व महिलांना सक्षम आणि राजकारणामध्ये पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून महिला एकत्रित करण्यासाठी ,आणि महिलांना प्रचाराच्या व सामाजिक राजकीय प्रवास आणण्यासाठी तसेच या विधानसभे मधील काँग्रेसचा उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी माझी निवड करण्यात आली .माझ्या या निवडीचे श्रेय सन्माननीय तेलंगणाचे प्रभारी माणिकरावजी ठाकरे यांनी मला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालय 24 अकबर रोड नवी दिल्ली येथून पत्र नियुक्तीपत्र देण्यात आले ,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले जी. महाराष्ट्राच्या, मा विजय वडेट्टीवार,मा बाळासाहेब थोरात मा अशोकरावजी चव्हाण साहेब मा यशोमती ठाकूर अध्यक्षा राधिकाताई मखमले निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग प्रदेश महिला अध्यक्ष सन्माननीय संध्याताई सव्वालाखे यवतमाळ जिल्हाचे प्रभारी संजय राठोड सचिव देवानंदजी पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बलदेव जी राठोड तातु भाऊ देशमुख जावेद अन्सारी, अँडी शिवाजी मोघे साहेब वसंतरावजी पुरके सर कासावार साहेब आ मिर्झासाहेब यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष अँड प्रफुल जी मानकर , बाळासाहेब मांगुळकर प्रवीणभाऊ देशमुख अशोकराव बोबडे, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी रामभाऊ देवसरकर, बाळासाहेब चंद्रे ही निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे असे मयुरी नेवारे हीने कळविले आहे.