सामाजिक उपक्रमानी अमृत महोत्सव साजरा…

youtube

सामाजिक उपक्रमानी अमृत महोत्सव साजरा…

उमरखेड –
पार्वती ग्रुप उमरखेड व्दारा संचलित सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या संचालिका सौ कुसुमबाई
वैजनाथस्वामी शिरडकर यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने परीक्षा साठी लागणारे एक्झाम पॅड व शालेय साहित्याने तुला करण्यात आली व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती चे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर संस्थान उमरखेड येथे एकुण ७५ विद्यार्थीनिंना सदर साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी महात्मा बसवेश्वर सेवा समिती चे अध्यक्ष डॉ विष्णूकांत शिवणकर, बसवेश्वर संस्थान चे अध्यक्ष संतोष हिंगमिरे, प्रकाश दुधावर सर, पार्वती ग्रुप चे सदस्य रत्नाकर पुजारी,बालाजी शिरडकर,संतोष बीचेवार, ओंकार शिरडकर, सर्व समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.
या अशा आदर्श उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश जनसामान्यांपर्यत जायला हवा असे मत संस्थेचे संस्थापक व्ही के शिरडकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!