अनाथ मृत दत्ताला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले शहरातील नवयुवक (दत्ताचा राहत्या घरी आढळला होता संशयास्पद मृतदेह

youtube

अनाथ मृत दत्ताला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले शहरातील नवयुवक

(दत्ताचा राहत्या घरी आढळला होता संशयास्पद मृतदेह)
उमरखेड :
शहरातील दीपक उर्फ दत्ता केशव चिंचलवाड वय वर्ष 23 रा. राजेंद्र प्रसाद वार्ड उमरखेड यांचा दि. 5 मे रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळला.
सदर मृतदेहाच्या एक डोळा रक्ताने पूर्ण माखलेला व त्याच्या हातावर व पायाच्या पंजाला जमिनीवर घसाटुन रक्तस्त्राव होत होता. सदर पायाला वाळूचे कण चिटकलेल्या अवस्थेत होते व त्याच्या गुप्त अंगातून सुद्धा रक्तस्त्रा होत असल्याचे दिसून आले व सदर वरील सर्व बाबी लक्षात घेतल्या असता सर्व गोष्टी या संशयस्पद व मारहाणीच्या प्रकरणातून घडला असल्याचा संशय निर्माण झाला असून दिलीप उर्फ दत्ता यास काही अज्ञातांनी मारहाण करून खुन केल्याचा संशय सर्वत्र होत असल्याने अनाथ दत्तला न्याय मिळवून देण्यासाठी उमरखेड शहरातील युवकांनी पुढाकार घेत पोलीस स्टेशन येथे सदर दत्ताच्या मरणाबाबतची चौकशी होऊन कायदेशीर कार्यवाहि करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
सदरील युवकाला आई-वडील नसल्यामुळे व त्याच्या कुठल्याही व्यक्तीचा सहारा नसल्यामुळे तो त्याच्या घरी एकटा राहून मित्रमंडळींकडून जे मिळेल ते खाऊन आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करत असे व ही घटना घडण्याआधी तो त्याच्या नांदेड येथील आत्याच्या घरी राहण्यासाठी गेला होता व त्या ठिकाणी महानगरपालिकेत नळाला पाणी सोडण्याचे काम तीन महिन्यांपासून करत होता.पण दि . 30 ऐप्रिल रोजी त्याच्या मित्राच्या लग्नाकरिता तो नांदेडहून उमरखेड येथे आला होता. व आपल्या पूर्वीच्याच घरी राजेंद्र प्रसाद वार्ड येथे काही दिवस वास्तव्यात होता.व आचानक दिनांक 5 मे रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी त्याचा मृतदेह रक्ताने माखल्या अवस्थेत संशयस्पद आढळून आला त्यामुळे अनाथ दत्ताचा खूनच झाल्याचा संशय येत असल्याने शहरातील युवकांनी एकत्र येत पोलीस स्टेशन गाठून अनाथ दत्ताला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत सदर दत्ताच्या मृत्यूचा छडा लावून अनाथ दत्तला न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली.या राहूल मोहितवार,आविनाश ढेंगळे,बालाजी कर्हाळे,ओमकार भागवत,दामोधर इंगोले,रवी थोरात,विनोद धोत्रे,सुनिल भांडवले,श्रीधर इंगोले,प्रकाश वानखेडे,जय बनसोड आकाश हिंगाडे,ईश्वर गोश्वामी,किरण कांबळे,नितिन लांबटिळे,डिगांबर जोगदंड,संतोष कोकाटे,राहुल लांबटिळे, सतिष पानपट्टे,या सहज शेकडो युवक उपस्थित होते.

“चौकट ”

*बस स्थानक येथे दोन दिवसा आधी दत्ताचा काही युवकांसोबत वाद झाल्याची चर्चा:-*
शहरातील बस स्टॉप परिसरात दत्ताचा मृतदेह आढळण्याच्या दोन दिवसा आधी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान दत्ताचा काही अज्ञात लोकांसोबत वादविवाद झाल्याची चर्चा सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात होत असल्याने नेमका वाद कोणासोबत व कशासाठी झाला किंवा सदर वाद झाला किंवा नाही ? याचा छडा लावण्याचा आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे ठाकला आहे.

*चौकट:-*

*दत्ताच्या राहत्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्याच्या मोबाईलचा सी.डी.आर तपासण्याची ही मागणी*
दत्ताच्या राहत्या घराच्या परिसरातील भगतसिंग वार्ड ,राजेंद्र प्रसाद वार्डातील माणव सेवा मंदिर शाळा ते त्याच्या राहत्या घरापर्यंत च्या रस्त्यावरील या सह करोडी रोडवरील लालबहादूर शास्त्री इंग्लिश मीडियम स्कूल ते त्याच्या राहत्या घराच्या रस्त्यावरील व आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टीव्ही कॅमेरे या सदर घटनेच्या पाच ते दहा दिवस आधीपासूनचे त्याच्या मोबाईलवर आलेले कॉल डिटेल्स (सी. डी. आर) या सर्व गोष्टींचा तपास करून सदर युवकाचा खून किंवा मृत्यू हा कशामुळे झाला याचा उलगडा करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “अनाथ मृत दत्ताला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावले शहरातील नवयुवक (दत्ताचा राहत्या घरी आढळला होता संशयास्पद मृतदेह

  1. Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  2. you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic

  3. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!