आगामी सण उत्सव शांततेत व एकोप्याने साजरे करा – पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड

youtube

आगामी सण उत्सव शांततेत व एकोप्याने साजरे करा -.  पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड

उमरखेड –

आगामी होऊ घातलेले सण उत्सव साजरे करत असताना आपला इतरांना त्रास होऊ नये तसेच उत्सव हे आनंदात व ऐकोप्याने साजरे करा यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद ऐ मिलाद एकाच दिवशी आले आहे मुस्लीम बांधवाणी ईद ए मीलाद चा उत्सव हा एक ऑगस्ट रविवारी करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत आहे असे प्रतिपादन जिल्हापोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांनी केले आगामी येणारे सण तान्हा पोळा,गणेशउत्सव ,ईद ए मीलाद निमित्त नगर पालिका सभागृहात पोलीस प्रशासनाने आयोजीत शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार नामदेव ससाणे, उपविभागीय अधिकारी व्यकट राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, कोते, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव खडसे, तहसीलदार आनंद देऊळगावकर,महेशकुमार जामनोर,नितीन भुतडा,इनायतुला जनाब,सय्यद इरफान,डेव्हिड शहाणे,आदी उपस्थित होते पुढे बोलतांना पवन बन्सोड म्हनाले सण उत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आपल्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार सोशल मीडिया चा योग्य प्रकारे वापर करा ,एखादी अप्रिय घटना घडत असल्यास त्वरित पोलीस प्रशासनास कळवा तसेच व्यसन न करता सण साजरा करा तसेच समाज प्रभोधनात्म देखावे गणेश मंडळांनी सादर करावे असे आवाहन त्यांनी केले.मागील सात वर्षा पासून शहरा सह तालुक्यातील सण उत्सव हे सर्व धर्माचा आदर करत आनंदात साजरे केले आहेत याही वर्षी आगामी सण उत्सव हे सर्व धर्माचा आदर करत आनंदात साजरे होतील असे विभागाचे आमदार नामदेव ससाणे यांनी सांगितले तर , गेणेशउत्सवा दरम्यान गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी काही अडचणी मांडल्या त्यामध्ये प्रामुख्याने वीज पुरवठा, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे, पैनगंगा नदी पुलावरील विसर्जन स्थळी सोई सुविधा या त्वरित सोडविण्यात याव्या अशा सूचना जिल्हा अधिकारी पंकज आशिया यांनी सबधितांना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी राठोड, प्रकाश दुधेवार ,इनायतुला जनाब ,गाझिअसर,विनोद शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार शंकर पांचाळ यांनी केले यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य सिरज कमिटीचे सदस्य पोलीस पाटील शांतता कमिटीचे सदस्य विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,विविध पक्षाचे सदस्य कार्यकर्ते, पत्रकार ,प्रतिष्ठित नागरीक उपविभागातिल पाचही ठाण्याचे ठाणेदार उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!