औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा वृक्षांचा 9वा वाढदिवस साजरा उमरखेड

youtube

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा वृक्षांचा 9वा वाढदिवस साजरा

उमरखेड

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वृक्ष संवर्धनाच्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत वृक्षांचा 9वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वृक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली होती व संपूर्ण परिसर हिरवाईने नटून गेला होता.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय चितांगराव कदम सर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य वि. ना. कदम उपविभागीय अधिकारी श्री सखाराम मुळे प्रकाश दुधेवार नारायण वड्डे सर हे उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले
यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत समितीच्या कार्याचे कौतुक केले. समाजात पर्यावरण जागृती वाढविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांची नितांत गरज आहे, असे मत प्रमुख अतिथीनी यावेळी व्यक्त केले. वृक्ष लावगड करणे खूप सोपे आहे परंतु त्याचे संवर्धन करून त्याचे जतन करणे खूप जिकरीचे आणि कठीण कार्य आहे. परंतु ते कार्य औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या सातत्यपूर्ण निस्वार्थ कार्यातून पार पाडले गेले आणि यापुढेही सुद्धा त्यांचे हे कार्य निरंतर चालू राहील आणि पुढील पिढीसाठी ते प्रेरणादायी असणार आहे असे विचार अध्यक्ष स्थानावरून बोलताना चितांगराव कदम सर यांनी व्यक्त केले .
औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या वृक्ष वाढदिवस कार्यक्रमाच्या औचित्याने चितांगराव कदम सर यांनी 151 वृक्ष, दत्ता हेलगंड यांनी एक ड्रिप बंडल, प्रतिष्ठित व्यापारी किशोरजी भंडारी यांनी 5 हजार रुपये , प्रकाश देशमुख यांनी एक हजार रुपये, शेवंतराव गायकवाड यांनी एक हजार रुपये वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष निधी दिला .या नंतर समितीला सदैव मदत करणाऱ्या वृक्षप्रेमींचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत एक वटवृक्ष लावून करण्यात आला . तदनंतर पावसाच्या हलक्याशा सरी मध्ये आणि पक्षाच्या सुमधुर मंजूळ स्वरात बर्थ डे गार्डन वर मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजन करून चहा पाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास ऍड. विलासराव देवसरकर, गिरी, आनंदराव चिकने, सुधाकर वानखेडे सर, दत्तात्रय गंगासागर,प्रा अनिल काळबांडे, अनिरुद्ध रेघाटे, नलिनी ठाकरे , संदीप घाडगे, दत्तात्रय दुर्केवार, गजूभाऊ व्यवहारे ,वसंतराव देशमुख सर, चव्हाण सर, रामदास काळे,आकाश माने ,योगेश बोकन, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत धुळे सर व शिक्षक वृंद ,पत्रकार सविताताई चंद्रे , पत्रकार गजानन वानखेडे, समिती सदस्य मारुती महागडे, भारत कुलकर्णी, वसंतराव पांडे, अक्रम अली,अशोक शिरफुले, प्रकाश शेळके, वीरेंद्र खंदारे, विजय चौधरी ,ज्ञानेश्वर खांडरे ,दीपक ठाकरे, वैभव कोडगीरवार, धनंजय भागवत,शुभम माने, विजय रेघाटे तथा अध्यक्ष दिलीप भंडारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर खांडरे, प्रास्ताविक विजय रेघाटे यांनी तर आभार वीरेंद्र खंदारे यांनी मानले.

चौकट
विद्यार्थी हेच देशाचे भविष्य असल्यामुळे वृक्षाबद्दल त्यांनाही वृक्षाचे महत्व कळाले पाहिजे म्हणून यावर्षी एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम समिती राबवित आहे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने 10 वर्षात गाठला 10 हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा यशस्वी टप्पा

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!