छत्रपती ग्रुप जवळगाव तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.
छत्रपती ग्रुप जवळगाव तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
उमरखेड
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महादेव मंदिर जवळगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून अभिवादन करून जयंती साजरी केली.
यावेळी अभिवादन करतांना गावातील छत्रपती ग्रुप चे सदस्य सटवाजी पवार सर,संजय पवार (दिघडकर),प्रधुम्न पवार, स्वप्नेश मुंदडा,अशितोश पवार,दत्तराज पवार,अक्षय पवार, पुजाराम काळे, संभाजी काळे,संतोष काळे, रुख्माजी ससाणे, उत्तम काळे, मुंजाजी गाडगे, पंकज काळे,अतुल ससाणे,बालाजी पवार,सिध्दु पवार, दिनेश पवार,अविनाश पुरी,अभिषेक देवसरकर,शुभम माने ई. उपस्थित होते.