स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
स्विमिंग पुल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपानाचा बळी?
उमरखेड…वसंता नरवाडे
उमरखेड येथील नगर परिषदेच्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली .
उमरखेड येथे नगर परिषदे च्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्या करिता बालक बालिका तरुण वर्ग जात असतो आज दिनांक २५ जून रोजी २०२२ शनिवारी उमरखेड येथील शेख बिलाल मुनाफ कुरेशी वय १३ वर्षे हा बालक दुपारी १ते २ वाजता चे दरम्यान सदर स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्यामध्ये बुडवून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
चौकट :
घटनेस जबाबदार कोण?
मुख्याधिकारी दोषींवर कारवाई करणार का?
नगर परिषदेच्या स्विमिंग पूल (जलतरण तलाव ) मध्ये गार्ड व प्रशिक्षक नेमलेले असतांना ही घटना घडलीच कशी? याचा अर्थ मुलगा डुबताना त्या ठिकाणी कर्तव्यावर गार्ड किंवा प्रशिक्षण नव्हतेच. नियमानुसार प्रशिक्षक उपस्थित असणे गरजेचेच आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी दोषींवर काय कारवाई करणार ह्यावर सर्वांचे लक्ष आहे