बस स्थानक आवारातील मटका बंद करा – शिवसेना कामगार संघटना

बसस्थानक आवारातील मटका बंद करा – शिवसेना कामगार संघटना.
श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम
माहूर शहरातील पोलीस प्रशासनाला ‘ सद्रक्षणाय खलनिग्रणाय ‘ या ब्रीद वाक्याचा विसर पडल्याचे चित्र आहे . त्यामुळे खल वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. माहूर शहरासह परिसरात सट्टा मटका , गुटका,दारू विक्री , जुगार अड्डे यासारखी विविध अवैध धंदे जोमात सुरु आहे. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.पोलीस प्रशासनाचे या अवैध धंद्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र माहूर शहरात बघायला मिळत आहे .
साडे तीन शक्ति पीठा पैकी एक मूळ शक्ति पीठ असलेल्या माहूरगड येथे मटका व्यवसायाने धुमाकूळ घातला असून खाकी वर्दीतील अधिकारी ध्रुतराष्ट्राच्या भुमिकेत असल्याने गली बोळीत तर सोडाच खुलेआम एस.टी.बस स्थानकात मटका व्यवसाय थाटल्याने मटका शौकिन बाहादरांचा मुक्त संचार वाढला असल्याचा त्रास प्रवाशी व भाविकांना होत असल्याने बसस्थानक आवारातील मटका व्यवसाय बंद करण्याचे निवेदन शिवसेना कामगार संघटनेच्या वतीने दि.१ जून रोजी माहूर पोलीस प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर शिवसेना कामगार संघटनेचे ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर गुजलवाड,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,अनिल धौञे,संतोष लिमकर,श्र्रूषीकेश खंदारे यांच्या साक्षर्या आहेत.
चौकट…
माहूर शहरासह तालुक्यात सट्टा,मटका, जुगार, दारू, गांजा,गुटख्यासारखे अवैध धंदे खुले आम सुरू असून याबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध होत असल्या तरी बातमीचा परिणाम म्हणून पोलीस प्रशासनाकडून किरकोळ असलेल्या अवैध व्यवसायीकावर थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र बडे मासे हे मोकळेच फिरत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची एकतर पोलिसांची हिंमत होत नाही किंवा हिंमतीची दाद आधीच मोजली जात असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पोलिसांना माहिती नाही की,अर्थपूर्ण संबंध जोपासले जात आहेत,अशी एकच चर्चा शहरात होत आहे.
चौकट…
बसस्थानक परिसरात खुलेआम व राजरोस पणे चालु असलेल्या मटका व्यवसायामुळे एस.टी.बसस्थानकात येणार्या प्रवाशी व भाविकांना मोठा ञास सहन करावा लागत असल्याचे अनेक वेळा माहूर पोलीसांना लेखी व तोंडी कळवले आहे.परंतु पोलीस प्रशासनाने अद्याप कोणती ही कार्यवाही केली नाही.
व्ही.टी.धुतमल
माहूर आगार प्रमुख.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://www.binance.com/bg/join?ref=V2H9AFPY
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.