तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्षपदी संदीप बुर्रेवार

तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्षपदी संदीप बुर्रेवार
झरी जामणी : तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष पदावर संदीप बुर्रेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप बुर्रेवार २४ वर्षापासून काँग्रेस बरोबर असून सक्रिय राजकारणात आहेत. काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसचे खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांनी नाव सुचवल्यावरून काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. निवड होताच संदीप बुर्रेवार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्षपदी संदीप बुर्रेवार यांची निवड होताच काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण असून तालुका काँग्रेस कमेटी व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोबत फोटो आहे.