आदिवासी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-. राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी.

youtube

आदिवासी संघर्ष परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-.
राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी

उमरखेड
उमरखेड: आदिवासी नायक तंट्या मामा भिल्ल व सोमा डोमा उमरे आंध यांच्या स्मृती दिनानिमित्ताने रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरखेड येथे “आदिवासी संघर्ष परिषदेचे ” आयोजन बिरसा क्रांती दलाचे वतीने करण्यात आले आहे. अनेक बाजुंनी आदिवासींच्या विरुध्द षडयंत्र सुरू आहेत.यामध्ये षडयंत्रकारी यशस्वी झालेत तर आदिवासी समुदाय आपला आत्मसन्मान गमावुन बसेल.आदिवासीं समाजाची वाटचाल गुलामीकडे सुरु होईल. असे होवु नये यासाठी काही मुद्यावर चर्चा करण्यासाठी आदिवासी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासींना वनवासी म्हणून संबोधित करणे, ६ जुलै २०१७ चा सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे,पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, गैरआदिवासींना दिलेले नोकरी,शिक्षण ,व्यवसाय ,राजकारण,अधिसंख्य पदावरील संरक्षण ,नव्याने सुरु झालेले डिलिस्टिंग आणि उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील आदिवासीं समाजावर होणारा अन्याय व अत्याचार अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील आदिवासीं समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध आंदोलनासाठी आदिवासीं समाजाला स्वतःचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने “आदिवासी संघर्ष परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आदिवासीं संघर्ष परिषदेसाठी राजीव गांधी पंचायत संघटक विभाग महासचिव महाराष्ट्र प्रदेश साहेबराव कांबळे हे परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत सोबतच आदिवासीं समाजाचे उच्चपदस्थ व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी जिल्हयातील सर्व समाज बांधवांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी यांनी केले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!