प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याची आढावा बैठक संपन्न.

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याची आढावा बैठक संपन्न

*संघटनेच्या कार्यालयाचे केले नियोजन*

देगलूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देगलूर तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक देगलूर येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मंनधरणे यांनी देगलूर शाखेच्या वतीने मागील वर्षातील कार्यक्रमाची माहिती दिली व पुढील वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना यावर विशेष चर्चा करण्यात आली. देगलूर येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्यालय उभारण्याची योजना आखण्यात आली. पत्रकार व त्यांच्या कुटुंबाना येणाऱ्या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार यांनी सांगितले. या बैठकीचे आभार तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गजलवार यांनी मानले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मनधरणे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गजलवार, तालुका सचिव ईश्वर देशमुख, तालुका संघटक मनोज बिरादार, तालुका सहसंघटक मलिकार्जुन कडलवार, तालुका प्रसिद्धीप्रमुख माधव ऊप्पे,
शहराध्यक्ष संतोष पैलावार, राजू कांबळे, शहर उपाध्यक्ष मारुती देगावकर, शहर सचिव चंद्रशेखर पणतूलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुका उपाध्यक्ष गजलवार यांनी केले

Google Ad
Google Ad

4 thoughts on “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याची आढावा बैठक संपन्न.

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!