विनायक दामोदर सावरकर जयंतीला लोकार्पण कार्यक्रम सोहळा
विनायक दमोदर सावरकर जयंतीला लोकार्पन कार्यक्रम सोहळा
उमरखेड..
वीर सावरकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान द्वारा संचालित विनायक दामोदर सावरकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा 28 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे संपूर्ण वास्तु गत दोन वर्षा लोकवर्गणीतून उभी झाली आहे. या लोकार्पण सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा साकरण्याकरिता आर्थिक मदत करणारे कृष्णा राव काळेश्वरवकर ,कृष्णाराव पांडे, वसंत पांडे, किशोरी जोशी, शालिनी देशमुख, नंदा मामीडवार, संगीता सिंगम, प्रेरणा कुंदे, ओम प्रकाश व दिलीप सारडा, प्रकाश उल्लगवार , बाबाराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.नामदेव ससाने प्रमुख पाहुणे अध्यक्ष राजश्री पाटील. आदित्य तुंगनेवार , माजी आ.इंगळे ,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, मा. खडसे, तातू देशमुख, राजू जयस्वाल, तालुका संचालक विजय चौधरी गटशिक्षणाधिकारी पी.आर खांडरे यांची उपस्थिती राहणार आहे. शैक्षणिक शुल्कावर संस्था ही शाळा मागील सात वर्षांपासून चालवित आहे. या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे पदाधिकारी प्रा.गिरिष देशमुख , महेश काळेश्वरवकर ,मनीष भटटड ,भारतराव कुलकर्णी,राजू देशपांडे, योगेश बोकंन, मनोज पांडे, अजय पांडे, लक्ष्मिकांत लिंगदे मनोज देव, गणेश शिंदे ,यांनी केले आहे