ढाणकी बिटरगाव रोड नव्याने करा.

youtube

ढाणकी ते बिटरगाव रोड नव्याने करा

[ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, उमरखेड यांनी दिले आमदार व तहसीलदार यांना निवेदन]

उमरखेड(प्रतिनिधी)
दि.18_जुन

ढाणकी ते बिटरगाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. व या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाले असून या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, मागील चार महिन्यात 5 ते 6 अपघातामध्ये मृत्युमुखी पडले आहे.
विशेष म्हणजे या महिन्यात, सहस्रकुंड पर्यटनस्थळी पर्यटकांची वाढती गर्दी पाहता, वाहनांचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. तरी या रस्त्यावरून अपघात होण्याचे संभावना दिसून येत आहे.
या मार्गावरील वाहतूक, जवळपास 40 गावांना जोडणारी आहे. तरी संबंधित विभागाने जातीने लक्ष देऊन, ढाणकी ते बिटरगाव रस्ता पूर्णत्वास न्यावा अशी मागणी,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुका यांच्या वतीने निवेदनाच्या मार्फत करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित पदाधिकारी अनिल राठोड(जिल्हा अध्यक्ष) सविता चंद्रे (राज्य महिला अध्यक्ष) मारुती गव्हाळे (तालुकाध्यक्ष) सुनील ठाकरे, कमलाकर दुलेवाड,गजानन वानखखेडे,विवेक जळके, मैनोद्दीन सौदागर,गजानन नावडे, हरिदास इंगोलकर, नयूम शेख, बाबा खान,शैलेश कोरडे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!