प्रा. डाँ. अनिल काळबांडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर
प्रा.डॉ,अनिल काळबांडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जिवन गौरव पुरस्कर जाहीर.
उमरखेड ता.प्र.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजीक,शैक्षणिक, साहित्यीक या श्रेणीत उलेखनिय कार्याबद्दल प्रा,डॉ.अनिल काळबांडे यांना २०२२चा महत्वाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जिवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ मार्च रोजी नागपूर दिक्षाभूमी येथे विषेश मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
महामंडळाच्या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांना महामंडच्या वतीने हा राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. यात प्रा.डॉ, अनिल काळबांडे यांना आंबेडकरी चळवळ व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल या श्रेणीत हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. नागपुर येथे होणाऱ्या या समारंभास प्रमुख अतिथी भदंत नागार्जुन सुरई ससाई, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत, मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, जगप्रसिद्ध मेंदुरोगतज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम, वनराईचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष दिपक कुमार खोब्रागडे यांनी दिली.
डॉ.आनिल काळबांडे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, हुंकार,करुणेचीओल,हे काव्यसंग्रह तर वामनदादा कर्डक, छत्रपती शाहु महाराज, सावित्रीबाई फुले,रमाई , हे चरित्र ग्रंथसंपदा’ प्रा.रविचंद्र हडसनकर ‘ सर्वासाठी बाबासाहेब समिक्षा,
अगळेवेगळे जग प्रवास वर्णन हा ग्रंथ ,
१२ वी युवकभारती सह अनेक पुस्तकांचे संपादकनात सहकार्य,शंभर च्यावर नॅशनल इंटरनॅशनल जर्नल मध्ये लेख , २००० व्याख्याने ‘ थायलंड ‘ दुबई ,इंडोनेशिया ,मलेशिया, श्रीलंका ,भुतान ,तायवान, येथे आयोजीत
विश्वमराठी साहित्य संमेलनात सहभाग
जिल्हा शांतता समिती सदस्य संतगाडगे बाबा विद्यापीठ अमरावती ,छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल येथे पीएच डी चे मार्गदर्शक तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बाहय परिक्षक असून अनेक सामाजिक संघटनेत पदाधीकारी म्हणुन कार्यरत आहेत त्यांना मिळलेल्या पुरस्कारा बदल सुमेधबोधी विहार समिती, दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघा तर्फे अभिनंदन करण्यात आले
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/ru/register-person?ref=V3MG69RO