धार्मिक सण, उत्सव शांततेत पार पाडून नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले – पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील.
धार्मिक सण ,उत्सव शांततेत पार पाडून नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडले – पोलीस अधीक्षक , डॉ दिलीप पाटील भुजबळ
उमरखेड
औदुंबर नगरी ही संतांची भूमी असून वेगवेगळ्या जाती धर्माच्या नागरिकांनी नुकतेच पार पडलेले विविध सण उत्सव, जयंती शांततेत पार पाडून आपण सजग नागरिक असल्याचे दाखवून दिले आहे. समजाप्रति कर्तव्य बजावले आहे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी केले ते रोजा ईफ्तार सर्वधर्मीय संमेलनात नगर परिषद मंगल कार्यालय येथे आयोजित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , माजी आमदार विजय खडसे , एड. संतोष जैन, साधु महाराज, प्राचार्य भन्ते खेमधम्मो महाथेरो, मौलाना अहमद रजाक, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी आदी मंचावर उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र शांतता नांदावी व जातीय सलोखा वाढावा यासाठी गुढीपाडवा, रमजान महिना, श्रीराम नवमी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, ईस्टर संडे, रमजान ईद व धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात एकोपा टिकविण्यासाठी उमरखेड येथील नगरपरिषद मंगल कार्यालयात सद्भाव , संवाद व सलोखा सर्वधर्मीय संमेलन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
समाजात जातीय सलोखा कायम राहावा यासाठी मंचावरील सर्व विचारवंतांनी आपले विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काजी सर यांनी केले तर संचालन गजानन शिंदे आणि आभार राजीव हाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमरखेड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक , उप पोलीस निरीक्षक , कर्मचारी , कॉन्स्टेबल यांनी परिश्रम घेतले.तसेच सर्व पत्रकार भगिनी व बंधु व विविध संघटनेचे पद अधिकारी राजकीय व सामाजिक व प्रशासकीय मंडळी उपस्थित होते.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.