शॉर्ट सर्किटमुळे कष्टकरी शेतकऱ्याचा जळाला ऊस विज वितरण कंपनीचा हलगर्जी कारभार

youtube

शॉर्ट सर्किटमुळे कष्टकरी शेतकऱ्याचा जळाला ऊस

 

विज वितरण कंपनीचा हलगर्जी कारभार

उमरखेड

तालुक्यातील पळशी येथील रंगराव शंकरराव सोळंके या शेतकऱ्यांचा एक एकर ऊस महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळाला ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता च्या सुमारात शॉर्ट सर्कीटमुळे जळल्पाची घटना घडली.

शेतकऱ्यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी उपकार्यकारी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य बीज वितरण कंपनी उमरखेडकडे अर्ज देऊन माझ्या शेतातील लाईनचे तार खाली लोबत असुन ती दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु त्या पत्राची कोणतीही दखल विज

वितरण कंपनीने न घेतल्यामुळे शॉर्ट सर्कीट होऊन सदर शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचा दिड लाख

रुपयाचा नुकसान झाले. त्यातच ऊस कारखान्याला जाण्यासाठी १२ ते १४ महीने लागत असुन विव वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. यासबंधी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली असुन शेतसर्फ नं. ७ / ४ या शेतातील ऊस जळाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून यास पूर्णपणे बीज महावितरण कंपनी जबाबदार असून या शेताचा ताबडतोब पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!