ढाणकी परिसरातील बेरोजगारांना मिळणार रोजगार.

youtube

ढाणकी परिसरातील बेरोजगारांना मिळणार रोजगार.

ढाणकी –

ढाणकी नगरीत तब्ब्ल २५ वर्षा नंतर मिळणार आहे बेरोजगारांना संधी. ढाणकी नगरीत कधी काळी जिनींग कारखाना होता. जिनींग कारखाना असल्यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होता. या बरोबर गावखेड्यातील शेतकरी आपापला कापूस घेऊन ढाणकी नगरीत येत असे. त्यामुळे स्थानिक बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत होती. मात्र या जिनींग प्रेसिंग युनिटला कोणाची नजर लागली आणी जिनींग प्रेसीन कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिनींग प्रेसिंग ची करोडो रूपयाची जमीन विकण्यात आली. जिनींग आणी जिनींग ची जमीन विक्री झाल्या पासून, ढाणकी मार्केट मधील मोठ्या प्रमाणात होत असलेली आर्थिक उलाढाल कमी झाली. कारखान्यावरील काम करणारे कामगार बेरोजगार झाले. तेव्हा पासून आज पर्यंत कोणताच मोठा उद्योग ढाणकी नगरीत उभारण्यात आला नाही. आपल्या नगरीत कारखाना असावा असे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना वाटत होते. ढाणकी नगरीत सोयाबीन कारखान्या करीता जमीन पाहण्याचे चालू असल्याची माहिती नगरीत होताच, सुशिक्षित बेरोजगार खुशीत दिसत आहे. ढाणकी गांजेगाव रोड वर २०० एकर मध्ये सोयाबीन वर प्रक्रिया उद्योग कारखाना उभारण्याचे काम चालू आहे. आज ग्रामीण,निमशहरी नगरीतील सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगाराच्या शोधात महानगरी कडे जात आहेत. ढाणकी नगरीत उभारण्यात येत असलेल्या कारखान्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.
उमरखेड, महागाव, हिमायतनगर, हदगाव, किनवट तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतल्या जाते. त्यामुळे पाच तालुक्याचा सेंटर पॉईंट म्हणून ढाणकी नगरीत सोयाबीन प्रक्रिया उद्योग कारखाना उभारण्यात येत असल्याचे, संचालका कडून सांगितल्या जात आहे. कारखान्यामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल सुद्धा होणार आहे. मार्केट मध्ये पूर्वी प्रमाणे गर्दी दिसून येईल.
सोयाबीन कारखान्या मध्ये कामगार स्थानिक घेण्यात यावा म्हणून, स्थानिक नेत्यांनी मागणी केलेली आहे. स्थानिक नेत्यांची मागणी अगदी रास्त आहे. मात्र स्थानिक नेत्यांनी जास्त ताणाताणी न करता सोयाबीन प्रक्रिया उद्योग कारखान्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यापारी,सुशिक्षित बेरोजगार तरुण करत आहेत.

चौकट

ढाणकी नगरीत सोयाबीन वर प्रक्रिया उद्योग कारखाना होत आहे. आपल्या शहरात मोठ्या प्रमाणात भविष्यात रोजगार उपलब्ध होणार. आज कारखान्याचे प्राथमिक कामे चालू आहेत. कारखान्यावर आपल्या नगरीतील व गावखेड्यातील बरेच कुटुंबाची, सोयाबीन कारखान्यावर उपजीविका अवलंबून आहे. भाजपा माजी शहर अध्यक्ष रोहित वर्मा यांनी कारखाना संचालक यांना मागील सहा महिन्या खाली बोलून, स्थानिक बेरोजगार तरुणांना या कारखान्यात नोकरी कामे देण्याची मागणी केली. आणी कंपनी संचालकांनी ती मान्य करून, स्थानिक नागरिकाला कंपनीत भरती करण्यात आले.
कम्पनीचे कामे बरेच महिन्या पासून चालू आहेत. आज जे काही सर्व पक्षीय एकत्र येत सोयाबीन कम्पनी मध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करत आहेत, ते फक्त एक राजकीय स्टंट आहे.
आपल्या नगरीत होत असलेल्या सोयाबीन कम्पनी कडे पाहून इतर उद्योजक कम्पन्या, आपली इन्व्हेस्टमेंट ढाणकी नगरीत करणार आहेत. त्यामुळे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात MIDC उभी राहिलेली दिसेल. नगरीतील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.
आपल्या नगरीतील काही राजकीय पक्ष आज विरोध करून भविष्याचे नुकसान करून घेत, बेरोजगारी वाढीस हात भार लावून, आर्थिक दृष्ट्या उभारी घेणाऱ्या युवकाचे खच्चीकरण करत आहेत.

रोहित वर्मा
माजी भाजपा शहरअध्यक्ष ढाणकी.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “ढाणकी परिसरातील बेरोजगारांना मिळणार रोजगार.

  1. The Beatles – легендарная британская рок-группа, сформированная в 1960 году в Ливерпуле. Их музыка стала символом эпохи и оказала огромное влияние на мировую культуру. Среди их лучших песен: “Hey Jude”, “Let It Be”, “Yesterday”, “Come Together”, “Here Comes the Sun”, “A Day in the Life”, “Something”, “Eleanor Rigby” и многие другие. Их творчество отличается мелодичностью, глубиной текстов и экспериментами в звуке, что сделало их одной из самых влиятельных групп в истории музыки. Музыка 2024 года слушать онлайн и скачать бесплатно mp3.

  2. For the past few days I’ve been an avid follower of this awesome site, they have brilliant content for fans. The site owner excels at captivating readers. I’m thrilled and hope they keep up their magnificent work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!