ढाणकीत शॉटसर्कीट मुळे उडलेल्या भडक्यात चार दुकाने जळून खाक.
ढाणकीत शॉटसर्कीट मुळे उडलेल्या भडक्यात चार दुकाने जळून खाक.
ढाणकी –
शॉटसर्कीटमुळे लागलेल्या भिषण आगीत ढाणकीतील लघु व्यवसायीकाचे चार दुकाने जळून खाक झाल्याची घटना दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. ही आग एवढी भिषण होती की,आगीचे गोळे जवळपास विस ते पंचविस फुटापर्यंत आकाशाकडे वर झेपावत होते.आगीला अटोक्यात आणन्यासाठी अग्नीशामक दलाच्या जवानांना तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.आग विझल्यानंतर चार दुकानातील सामानाची राख रांगोळी झाली होती.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, स्थानिक उत्पन्न बाजार समितीच्या दुकान गाळयाला लागून असलेल्या महेश पाटील चंद्रे यांच्या जागेत शेख सत्तार शेख लाल यांचे फर्निचरचे दुकान आहे. त्यांच्या बाजूलाच योगेश बाळू चापके यांचे चापके वेल्डींग वर्कशॉप असून, त्यांना लागुनच सदानंद भोयर यांचे अॅटोमोबाईल्स स्पेअर पार्टसचे दुकान आणि कांता वासमवार यांचे बांबु विक्रीचे दुकान त्यांच्या डाव्या बाजूला आहेत. रात्री आठ वाजता ही चारही दुकाने बंद करून मालक आपआपल्या घरी गेले होते. अशात शेख सत्तार शेख लाल यांच्या फर्निचर दुकाणात अंदाजे ९ च्या नंतर त्रिफेज वायर मध्ये फाॅल्ट होवून, विजेची पार्कींग झाली.पार्कींगमुळे उडालेले आगीचे गोळे फर्निचरच्या दुकानातील वेस्ट मटेरीअल, अर्थात लाकडी भुस्यावर आगीचे गोळे पडले. आणि पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले.उडालेल्या आगडोंब मध्ये शेख सत्तार यांच्या दुकानातील संपूर्ण लाकडी साहित्य व मोठया मशीनरी विक्रीसाठी बनवलेले पलंग ,दरवाजे,खूर्ची यांनी पेट घेतला. या आगीने शेजारी असलेले चापके यांचे वेल्डींग वर्कशॉप ,भोयर यांचे अॅटोमोबाईल्स स्पेअर्स पार्ट दुकान व वासमवार यांचे बांबुचे लाकडी बल्ली दुकानाला आगीने कवेत घतले.एकाच वेळेस चार दुकानाला लागलेल्या आगीने परीसरात हाहाकार माजला.
या भिषण आगीची वार्ता सामाजीक कार्यकर्ते एजाज पटेल यांनी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. तद्नंतर ठाणेदार भोस यांनी अग्नीशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी पाचारण केले.तसेच लागलेल्या भिषण आगीची घटना उमरखेड तहसीलदार आनंद देवुळगावकर यांना कळविली.क्षणाचाही विलंब न करता नायब तहसील पवार, मंडळाधीकारी सचिन फटाले,तलाठी पि.एस. शीवनकर,तलाठी पि.टी.डोंगरे,कोतवाल अभिलाश गायकवाड,कोतवाल सै.इबादुला यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली.शेजारी असलेले शेतमालक महेश पाटील यांनी नागरीकांच्या मदतीने पाईपलाईनने पाणी पुरवठा करून आग नियंत्रणात आणन्यासाठी मोलाचे सहकार्य केले.आग विझल्यानंतर ठाणेदार प्रताप भोस ,पोलीस उपनिरीक्षक कपील मस्के,बिटजमादार मोहन चाटे,निलेश भालेराव,रवि गीते,दत्ता कुसराम,गजानन खरात इ.पोलीस कर्मचाऱ्यासह महसूल विभागाने आपतग्रस्त दुकानदाराच्या आर्थिक नुकसानीचा पंचनामा केला.दुसऱ्या दिवशी विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या भिषण आगीत राख रांगोळी झालेल्या आपतग्रस्त दुकानदाराच्या दुकानाच्या सामानाचा पंचनामा केला.आग नेमकी कशामुळे लागली यांचा प्रथमदर्षी पुरावा आढुळुन आला नसल्याचे अभियंता चव्हाण यांनी सांगीतले. मात्र जी घटणा घडली ती अतिशय दुर्देवी आहे असे म्हटले. आपतग्रस्त दुकानदारांनी बिटरगाव पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचे सांगीतले.
भिषण आगीत चार दुकानदाराचे असे झाले लाखात नुकसान
१) शेख सत्तार शेख लाल – २० लाख ३३ हजार ४०० रू.
२)योगेश बाळू चापके – ४ लाख ७७ हजार रू.
३)सुन्दरकांता वासमवार – ३ लाख ८० हजार
४)सदानंद भगवानराव भोयर -२ लाख ५५ हजार रू