रामभाऊ देवसरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांनी साठी अभ्यासिका भेट
रामसाहेब देवसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरिब विद्यार्थीनी साठी मोफत अभ्यासिका भेट*
(उमरखेड.. प्रतिनिधी: सविता चंद्रे)
गावंडे महाविद्यालय , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व मॉडर्न कॉन्व्हेंट येथील कर्मचाऱ्यांकडून रामसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक ११ मार्चला महिलांकरता मोफत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला अभ्यासिकेचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. गाव तिथे अधिकारी या संकल्पनेला मूर्त रूप आणण्यासाठी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आज कर्मचाऱ्यांमार्फत महिला मोफत अभ्यासिकेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस साहेब व उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच कापडनिस यांनी असे विचार माडले प्रत्येक विद्यार्थी नी आपल्या स्वतःच्या बळावर छान अभ्यास करून चांगली नोकरी मिळावावी .व आपले यश सपादित करावे.उ.पो.अधिकारी वालचंद मुडे यांनी असे म्हटले उमरखेड मध्ये मोफत अभ्यासिका गोर व गरिब विदयार्थी नी साठी खरच छान हा उपक्रम आज प्रत्येक क्षात दिसला.
यावेळी प्राचार्य वद्राबादे सर,तलाठी दुरकेवार , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्य गुजर सर,मुख्याध्यापक प्रमोद देशमुख, प्राचार्य दीपाली चेडे मॅडम, पर्यवेक्षक लाभसेटवार सर प्रा.डी.एस. शिदे नलावडे पाटील , साई काळे सर, शिवराज चिंचोलकर सर, अभ्यासिकेच्या संचालिका सौ चंदा देशमुख मॅडम, व सर्व शाळेचा व स्टाँफ व विद्यार्थी उपस्थित होते. लक्ष्मीकांत नंदनवार व व्यंकटेश पेशनवार, अविनाश मुन्नारवार व सविता चंद्रे या सर्व पत्रकाराचि उपस्थितीत होती. तर सुत्रसंचालन प्रा.तायडे सरानी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ वाद्राबादे सर होते .