पत्नि चा खुन करणारा फरार आरोपी तब्बल एका महिन्यानंतर जेरबंद – ढाणकी येथील कविता नारमवाड खुन प्रकरण.].

youtube

पत्नि चा खुन करणारा फरार आरोपी तब्बल एका महिन्यानंतर जेरबंद.

[ढाणकी येथील कविता नारमवाड खुन प्रकरण.]

ढाणकी

एका महिण्यापूर्वी ढाणकीत घडलेल्या हत्याकांडामुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला.
पतीने पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरुन पलायन करण्यात यशस्वी झाला होता. ही घटना २१ जुलै च्या रात्री घडली होती. तब्बल एका महिण्यापासुन बिटरगांव पो. स्टे. चे कर्मचारी आरोपीच्या मागावर होते. परंतु आरोपी मोबाईल वापरत नसल्यामुळे व कोणत्याही नातलगांच्या संपर्कात नसल्यामुळे त्याचे लोकेशन शोधणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीच्या शोधार्थ नांदेड, हिमायतनगर,भोकर, आदीलाबाद, नागपूर, म्हैसा, छ. संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी शोधपथके सुध्दा पाठवण्यात आली. शेवटी आज २ सप्टेंबर रोजी गुप्त माहीतीदाराकडून आरोपी शिवाजी दशरथ नारमवाड हा त्याचे गावाकडील शेतामध्ये लपुन बसल्याची माहीती मिळाली.आणि बिटरगांव पो.स्टे. ने भोकर पोलीसांच्या मदतीने चिंचाळा येथे आरोपीच्या गावी त्याचे शेतात जाऊन मोठया शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीवर पो.स्टे. बिटरगांव येथे अप.क्र.२७८/२३ कलम ३०२ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
वृत्त लिहीपर्यंत कारवाईची प्रक्रीया सुरु होती.
पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड, अप्पर पो.अ. पियुष जगताप, उपविभागीय पो.अ. प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुजाता बन्सोड यांचे नेतृत्वात, पोउपनी. शिवाजी टिपुर्णे, बीट जमादार मोहन चाटे, गजानन खरात, पोकॉ. निलेश भालेराव, दत्ता कुसराम, शरद चव्हाण, दत्ता कवडेकर,म.हो. प्रकाश केंद्रे, चंद्रमणी वाढवे यांनी सदर कारवाई करून, पो.स्टे. बिटरगांव पुढील तपास करत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!