उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतऱ्यांना हेक्‍टरी एक लाखाची मदत द्या – वंचित बहुजन आघाडी

youtube

उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या
(वंचित बहुजन आघाडी ची मागणी)

उमरखेड प्रतिनिधी.
उमरखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि गुलाब वादळाच्या बसलेल्या तडाख्यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अतिवृष्टीमुळे, सोयाबीन कापूस उडीद मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे आता ती घेण्यापूर्वीच तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने आधार देऊन उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जमा करावी,तसेच पिक विमा कंपनीकडून आणेवारी व इतर जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची मदत तात्काळ जमा करावी,तालुक्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी , वीज वितरण कंपनी ने शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी त्वरित बंद करावी, अशी मागणी दिनांक ५ तारखेला वंचित बहुजन आघाडी उमरखेड तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांचे कडे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली आहे, राज्य सरकारने मागण्या त्वरित मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उमरखेड चे तहसीलदार देऊळगावकर यांचे कडे निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी चे ,जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे ,जिल्हा महासचिव डि के दामोदर ,
तालुका प्रमुख संतोष जोगदंडे,
नगरसेवक संबोधी गायकवाड,तालुका महासचिव शेख मदार मौलाना,उपाध्यक्ष हुसेन मौलाना,राजीव खंदारे,
अमोल काळबांडे,विष्णू वाडेकर, अर्जुन बर्डे,भारत कांबळे, सुनील राऊत सिध्दार्थ धोंगडे,राजाराम काकडे,राजू दाभाडे,संदेश बर्डे,गौतम कांबळे,संभाजी मुनेश्वर, आनंदराव वाहूळे, आनंदराव कांबळे, धम्मदीप पाईकराव, संतोष मासोळकर, गंगाराम दवणे, भीमराव हापसे,या सह अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे

Google Ad
Google Ad

1 thought on “उमरखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतऱ्यांना हेक्‍टरी एक लाखाची मदत द्या – वंचित बहुजन आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!