मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्त दान शिबीर व महिला चे सत्कार.

youtube

मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व महिलांचे सत्कार संपन्न .

उमरखेड . :

शहरातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते . वर्धापन दिनानिमित्त मराठी भाषा मराठी माणूस ,मराठी अस्मितेसाठी सोळा वर्षे चालू असलेले संघर्ष पूर्णत्वाला नेत सामान्य माणसाची हाके ची जाण ठेवून विविध प्रशासकीय व सामाजिक शेत्रातील सामान्यांच्या अडी-अडचणी जाणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उमरखेड शहरात कार्य करीत आहे याचेच फलित म्हणून पक्षाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमात महामानवांच्या व मा साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महिलांचे सत्कार करण्यात आले आज पर्यंत शहरात 16 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी माणसासाठी तसेच भुमिपुत्रासाठी संघर्षाची व आग्रहाची भूमिका नीभवत 16 वा वर्धापन दिन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रेम करणारे कार्यकर्त्यांनी रक्तदान केले तसेच सन्माननीय महिलावर्गाचा सत्कार घेऊन सन्मान करण्यात आले यावेळी उमरखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक सुजाता बनसोड मॅडम , देवसरकर मॅडम , सविता कदम मॅडम ,सविता चंद्रे महिला पत्रकार यांचा सुद्धा महिला दिनाचे औचित्य साधून स्वागत करण्यात आले
तसेच उमरखेड नगरीचे उच्चशिक्षित महिला पत्रकार , साहित्यकार प्रतिभा रामराव चौधरी यांचे “आजादी ” या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले . एक औदुंबर नगरीचा स्वाभिमान म्हणून औदुंबर नगरीची कन्या म्हणून “आजादी ” पुस्तकांचे लेखिका यांची आई रंजना रामराव चौधरी या माऊलीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आले
रक्तदान शिबिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरगच्च प्रतिसाद देत ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिड शहाणे .तालुका अध्यक्ष शेख सादिक .शहराध्यक्ष संदीप बिजारे पाटील.प्रकाश शिंदे .विशाल कदम . संदीप कोकाटे .प्रवीण भिमटे .विकी पडघणे .मनोज कदम .महेश काळबांडे .शिवा जाधव . बबन मनुलकर .शुभम अलट .अमोल मोरे . मुकुंद जोशी .आकाश ओझलवार . विजय सोनटक्के अदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्त दान शिबीर व महिला चे सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!