कु.मिताली वानोरेला निबंध स्पर्धत द्वितीय क्रमांक मिळाला.

youtube

कु. मिताली वान्नेरेला निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला*

उमरखेड:
महात्मा बसवेश्वर अभ्यासिका उमरखेड येथे पार्वतीबाई काशिनाथ शिरडकर ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मरसुळ ता. उमरखेड अंतर्गत सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजामाता या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये गट क्रमांक 2 मधून कु. मिताली रवींद्र वानेरे वर्ग 8वा गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर, उमरखेड येथे शिक्षण घेत आहे. तिचा द्वितीय क्रमांक आला. पार्वति चारीटेबल ट्रस्ट ने महिला दिनाचे औचित्य साधून एकूण 60 स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. त्यापैकी मितालीचा सुद्धा ट्रॉफी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आणि रोख रक्कम 700 रुपये देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मितालीने त्यामध्ये 500 रुपये टाकून 1200 रुपये पार्वती चारीटेबल ट्रस्ट ला असे विविध उपक्रम राबविल्याबद्दल परत संस्थेला भेट दिले. हे विशेष म्हणावे लागेल मितालीच्या यशाबद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदानी तिचे कौतुक केले. त्याच बरोबर पालक वर्गातून माने सर, संजय पाईकराव, चंदू कळसे, राजेश गांजेगावकर, गजानन सुरोशे, जिल्हेवार टेलर ,रमेश भागवत, के. डी. जाधव, हेमंत मनोहर,शेखर बंडेवार, अमोल माकोडे, कविवर्य रवींद्र चव्हाण व रविभाऊ वान्नेरे यांनी तोंड भरून कौतुक केले. उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती व्हावी हा शुभ आशीर्वाद सर्व पालकांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!