नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित.

youtube

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित
उमरखेड :-

कृषी महाविद्यालय उमरखेड व कृषी विज्ञान मंच, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला उपक्रमा अंतर्गत भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान द्वारा वृक्ष संवर्धन व पर्यावरण कार्याची दखल घेऊन उमरखेड येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार देऊन कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.विजयराव माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव माने उपस्थित होते.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने राबविलेल्या विविध पर्यावरण पूरक उपक्रमांमुळे उमरखेड टिमचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त कष्टकरी, शेतमजुर महिलांचा सन्मान, तालुक्यात विविध ठिकाणी पक्षांसाठी व जनावरांसाठी निर्माण केलेल्या पाणपोई व पाणवठे ,विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांएवजी मातीची मूर्ती बसवण्याची जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या” चला बनवूया मातीचे गणराया स्पर्धा”, दरवर्षी करण्यात येणारे पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तीचे वितरण, अनेक ठिकाणी घेण्यात आलेले स्वच्छता अभियान ,कोरोना काळात जनजागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन स्पर्धा ,पर्यावरण दिनानिमित्त तसेच भारतीय वन संवर्धन दिनानिमित्त घेण्यात आलेले विविध ठिकाणचे वृक्षारोपण कार्यक्रम, दरवर्षी निर्माण करण्यात येणारे सीडबाॅल निर्मिती उपक्रम, तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, मातीच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक घरीच विसर्जन करण्यासाठी केलेली जनजागृती ,वन्यजीव सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, दरवर्षी दिवाळीनिमित्त घेण्यात येणारा “एक पणती शहीदांसाठी” अभिनव उपक्रम ,संस्थेतर्फे गरजूंना ब्लँकेट, अन्नधान्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, जलसंवर्धन जनजागृतीसाठी दरवर्षी निर्माण करण्यात येणारे वनराई बंधारे, कामगारांच्या मुलांना करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य वाटप, सुरक्षेसंबंधी शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आलेली मार्गदर्शन शिबिर ,जयंतीदिनी थोर पुरुषांच्या जीवन चरित्र पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप, होळी पूजना निमित्त शेणाच्या चाकोल्यांचे वितरण, वटपौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली “सेल्फी विथ सौभाग्यवती स्पर्धा”, वटवृक्ष वाटप, वनसंवर्धन दिनानिमित्त घेण्यात आलेली राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा ,वृक्षारोपण जनजागृतीसाठी घेण्यात आलेली “वृक्ष गणेश संकल्पना”, जागर स्ञी जन्माचा, सन्मान कन्यारत्नाचा अभिनव उपक्रम, शेतकरी बांधवांना मल्टीविटामिन गोळ्यांचे वाटप, पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित पोस्टर स्पर्धा,मकर संक्रांति निमित्त महिलांना करण्यात आलेले वृक्षांच्या वाणाचे वाटप, दरवर्षी साजरा करण्यात येणारा वृक्षमित्र दिवस, इत्यादी अनेक उपक्रमांची दखल घेऊन भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान द्वारा सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक दिपक ठाकरे, अमरावती विभाग अध्यक्ष प्रभाकर दिघेवार, यवतमाळ जिल्हा सचिव गजानन रासकर, उमरखेड तालुका अध्यक्ष राजेश माने ,उमरखेड तालुका सचिव गजानन वानखेडे, उपस्थित होते.

 

Google Ad
Google Ad

1 thought on “नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!