जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य दिव्यांग आनंद रॅली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य दिव्यांग आनंद रॅली.
[दिव्यांग बांधवांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाबद्दल जल्लोष करत राज्य शासनाचे मानले आभार.]
उमरखेड .
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखवत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता सुद्धा देण्यात आली जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मंत्रालयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून करण्यात आली.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या 25 वर्षाच्या मागणीला यश आल्याने उमरखेड तालुक्यातील शहरातील शेकडो दिव्यांग बांधवांनी जय जिजाऊ दिव्यांग संघटना, प्रहार अपंग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भव्य दिव्यांग आनंद रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी गेल्या 25 वर्षापासून प्रहार चे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली होती ही मागणी राज्य सरकारने मान्य केल्याने राज्यभरात या निर्णयाचे स्वागत केले जात आहे .
दिव्यांग बांधवांना समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग अधिनियम 1995 च्या पूर्ततेसाठी व सर्व दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व जिल्ह्यात दिव्यांग भवनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणी या माध्यमातून सोडवल्या जाणार असल्याने या निर्णयाचे स्वागत उमरखेड शहर व तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी एकत्र येत उमरखेड शहरातील मुख्य मार्गावरून भव्य दिव्यांग आनंद रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाडू मिठाई वाटून त्याचबरोबर फटाक्यांची आतिश बाजी करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
तहसीलदार उमरखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व दिव्यांगांचे आधारवड बच्चू कडू यांचे आभार मानण्यासाठी आभार पत्र समस्त दिव्यांग बांधवांन कडून पाठविण्यात आले.
तसेच शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी , प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद राहुल मोहितवार, अंकुश पानपट्टे, अमोल आवटे, बंडू हामंद, अषिश हामंद, अनिल माने, गोपाल झाडे, सवान हिंगमिरे, संतोष आलट, वानखेडे सर ,बजरंग पवार ,इनायत, गौतम वाडेकर ,शैलेष मेंढे, मनोज वानखेडे, प्रवीण इंगळे, श्याम चेके, अभिजित गंधेवार, चंद्रकांत गायकवाड, बालाजी माने, विश्वास पतंगे, यांच्यासह जय जिजाऊ दिव्यांग संघटना व प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.