अमृत महोत्सवा निमित्त 15 फुंट लांब आणि 75 मिटर लांब झेंडा खांद्यावर घेऊन भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न.

youtube

अमृत महोत्सवा निमित्त 15 फुंट लांब आणि 75 मिटर लांब झेंडा खांद्यावर घेऊन भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न

उमरखेडः

उमरखेड..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त उमरखेड शहरात आयोजित भव्य तिरंगा रॅलीने औदुंबर वासियांच्या मनात राष्ट्रभक्तिची नवचैतना संचारल्याच्या विहंगम दृष्याची अनुभूती आज सर्वांना बघण्यास मिळाली. शेकडो राष्ट्रभक्तांच्या सहभागाने तिरंगा रॅलीची भव्यता आणि भारत मातेच्या जयघोषासह ‘वंदे मातरम’ ,अखंड भारत समर्थ भारत,’कौन चले भाई कौन चले भारत माॅ के वीर चले’,कश्मीर हो या कन्याकुमारी भारत माता एक हमारी,रॅली नही रेला है देशभक्तो का मेला है, हे नारे आसमंत दुमदुमून टाकत होते*.
या रॅलीला नगरपरिषद प्रांगणातून सुरुवात झाली. ढोल ताशाच्या दणदणानात ,भारत मातेची झाॅकी उभारण्यात आली होती .माजी सैनिक संघटना,भाजपचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते,
पतंजली महिला योग वर्ग ,वृक्षसंवर्धन महिला गृप,आर्य वैश्य महिला गृप ,इनरव्हील क्लब,बंजारा महिला गृप , महिला व युवती ,तरुण युवक,जेष्ठ नागरीक व उपस्थित होते. यावेळी (१२ फुट रुंद आणि ७५ मिटर लांब तिरंगा झेंडा) बनविण्यात आला होता. ही रॅली सुवर्ण पथक मार्गाने शहरात फिरुन याच प्रांगणात ‘जन गण मन’ हे गीत गात समारोप करण्यात आला .

Google Ad
Google Ad

1 thought on “अमृत महोत्सवा निमित्त 15 फुंट लांब आणि 75 मिटर लांब झेंडा खांद्यावर घेऊन भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!