लाईनच्या शॉर्टसर्किटमुळे फुल सजावट व बलून व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान महागाव – मुडाणा
- लाईनच्या शॉर्टसर्किटमुळे फुल सजावट व बलून व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान
महागाव – मुडाणा
महागाव तालुक्यातील मुडाणा येथे एमएसईबीच्या वीज लाईनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की जवळील इमारतींच्या काचा फुटल्या, तसेच सुमारे दोन तास आग सतत धगधगत होती.
ही आग अविनाश उत्तमराव चेडके यांच्या घराला आग लागली. घरमालक बाहेरगावी होते, तर पत्नी शेतात गेली होती. घरात एक चिमुकली मुलगी एकटीच होती. अचानक आग लागल्याचे लक्षात येताच ती मुलगी घराबाहेर पळाली आणि गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेतली.
गावकऱ्यांनी सांगितले की, घराजवळ असलेल्या 33 केव्ही वीज लाईनच्या पोलमुळे शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. घरात फुल सजावट व बलून व्यवसायाचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले होते. या आगीत किमान चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून कपडे, रोकड, सोनं-नाणे व इतर घरगुती साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे.
महागाव येथे अग्निशामक केंद्र असूनही गाडी उशिरा पोहोचल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उमरखेड येथून अग्निशामक वाहन येण्यासाठी सुमारे दोन तासांचा वेळ लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर गावातील युवक व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात यश आले.
यानंतर तहसीलदार अभय मस्के, पोलीस प्रशासन, तलाठी व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदारांनी सांगितले की, उद्याच पंचनामा करून नुकसानभरपाईबाबत कार्यवाही केली जाईल.
ही घटना नॅशनल हायवे सेवा दोष रस्त्यालगत घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच इतकी मोठी आग पाहिल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे



