महिरावणी येथील मातोश्री पाटील विद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस व आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन उत्साहात साजरा नाशिक: प्रतिनिधी

youtube

महिरावणी येथील मातोश्री पाटील विद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस व आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन उत्साहात साजरा

नाशिक: प्रतिनिधी
मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस व आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी दहावी या दोन गटात निबंध स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी निबंध स्पर्धेत ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तम निबंध लिहिले.आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यालयातील कुमार अथर्व प्रभाकर डगळे, कुमार आर्यन अशोक गोराळे, कुमार चेतन यशवंत राऊत, कुमार सार्थक रघुनाथ कापसे, कुमार रणजीत भैरवलाल गाडरी, कुमारी अनिता अशोक राठोड, कुमारी सपना काळू खोडे, कुमारी पायल भीमा डंबाळे, कुमारी शालिनी किसन बोडके, कुमारी अश्विनी गोकुळ खांडबहाले, कुमारी भाग्यश्री धनंजय खांडबहाले या अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अत्यंत प्रभावी व विचारप्रवर्तक भाषणे सादर केली.
यावेळी विद्यालयातील उपशिक्षक संजय पवार यांनी अल्पसंख्यांक हक्कांचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय प्रवासी दिनाचे सामाजिक व मानवी मूल्यांतील स्थान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वकृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते पेन देऊन अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका सुरेखा आहेर(भामरे) यांनी केले, तर आभार समाधान शेवाळे यांनी मानले. कार्यक्रमास उपशिक्षक देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले, अतुल कुलथे, दिलीप खांडबहाले, विलास येवले आदी शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!