चक्क हदगावांत व्यापाऱ्याच्या घरी धाडसी दरोडा.
चक्क हदगावांत व्यापाऱ्याच्या घरी धाडसी दरोडा
हदगांव :-
येथील जुने प्रतिष्ठित व्यापारी यादव आप्पा गंधेवार यांच्या घरी दरोडेखोराने धुडगूस घालून व चौघांना मारहाण करून त्यांच्याकडील चाव्या व अंगावरील दागिने हिसकावून घेतले. तिजोरीतील रोख रक्कम पाच लाख रुपये आणि अंदाजे ७१ तोळे सोने असा आजच्या खुल्या बाजारातील दराने सुमारे चाळीस लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले.
हदगाव शहरातील जुन्या गावातील बसवेश्वर चौक सर्वात जुने धनदांडगे व्यापारी व मोठे शेतकरी असलेले यादव आप्पा गंधेवार वय अंदाजे १०४ वर्षे त्यांचे एकमेव आपत्य म्हणजे त्यांची मुलगी प्रतिभा शेट्टी, त्यांचा मुलगा प्रमोद शेट्टी, व त्यांचा मुलगा डॉक्टर पवन शेट्टी आणि त्यांची पत्नी प्रसन्ना पवन शेट्टी आणि त्यांचे सहा महिन्याचे बाळ हे सर्वजण घरात राहत असतात. यांच्याकडे एकत्रित कुटुंबातील अंदाजे दीडशे एकर शेती असून वडीलोपार्जित सोने, चांदी खूप मोठी संपत्ती आहे. काल दिनांक १६ रोजी रात्री उशिरा म्हणजे दीडच्या नंतर चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये मागील बाजूने प्रवेश करून घरात प्रवेश मिळवला आणि थेट त्या वृद्ध दंपत्यास मारहाण करत त्याब्यांची तिजोरीच्या चाव्यांची मागणी केली. वृद्ध वगळता घरातील सर्वांना मारहाण करून व प्रसन्ना शेट्टी यांच्या अंगावरील सर्व दागिने ओरबडून घेतले. दरम्यान त्या दरोडेखोरांनी सहा महिन्याच्या बाळाला लक्ष करून त्याच्या गळ्याला चाकू लावून त्या कुटुंबाकडून चाव्या आणि इतरत्र ठेवलेले दागिने हस्तगत केले. घरातील सर्वांचे मोबाईल सुद्धा त्यांनी घेतले. आणि सर्वांना एका खोलीमध्ये डांबले आणि बाहेरून कडी लावून घेतली. घरातील सर्व ऐवज घेऊन मुख्यद्वारातून मालकाप्रमाणे निघून गेले. दरम्यान बाजूच्या गल्लीत असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात काही बेवारस तेलंगणा स्टेट पासिंगच्या दोन मोटरसायकली आढळून आल्यामुळे त्या भागातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात कळवले. सकाळी तीन वाजता येऊन पोलिसांनी त्या मोटरसायकल ताब्यात घेतल्या. परंतु तोपर्यंत ही दरोडा, लुटमार झाल्याचे पोलीस किंवा नागरिकांना सुद्धा माहीत नव्हते. नंतर गंधेवार व शेट्टी कुटुंबीय त्यांना डांबलेल्या खोलीचे दार तोडून बाहेर निघाले. आणि साडेचार वाजता ही घटना नागरिकांना समजली. सुमारे सहा वाजताच्या सुमारास अपग्रस्त डॉक्टर पवन शेट्टी यांनी पोलीस ठाणे गाठले तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच पोलीस उप विभागीय अधिकारी घटनास्थळी पोहचवून योग्य सूचना केल्या व पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांना मार्गदर्शन घेऊन श्वान पथकाला व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.
चोरट्यांनी हादगाव शहरातीलच दुसऱ्या गल्लीत एका असलेल्या दोन मोटरसायकल पळवले असल्याचे नंतर नागरिकांच्या लक्षात आले तपासासाठी आलेले स्वान पथक पन्नास मीटर अंतरावर जाऊन भरकटले व वापस आले या चोरी प्रकरणात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ समाज बांधवांच्या वतीने उद्या हदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समजले.
I really like your writing style, excellent info, thanks for putting up :D. “Kennedy cooked the soup that Johnson had to eat.” by Konrad Adenauer.