कार झाडावर आदळून भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू –

youtube

 कार झाडावर आदळून भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू – खरूस गावाचे नागरिक

उमरखेड –
भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरूष असे दोघेजण ठार झाले. तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना सेनगाव ते नर्सी नामदेव मार्गावरील गिलोरी पाटीजवळ ४ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
यातील जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील खरुस येथील पाच जण कारने छत्रपती संभाजीनगर येथून परत गावाकडे येत असताना त्यांची भरधाव कार शनिवारी पहाटेच्या सुमारास सेनगाव ते नर्सी ना. मार्गावरील गिलोरी पाटी जवळील वळण रस्त्यावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली असलेल्या एका झाडावर आदळली.

या घटनेची माहिती मिळतात नर्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी अपघातात कारमधील अनिरुद्ध तानाजी वानखेडे (वय २८) व अर्चना सुभाष वानखेडे (वय ३७ दोघे रा. खरूस ता. उमरखेड) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर सुभाष वानखेडे, संतोष वानखेडे, व अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नर्सी ना. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नर्सी ना. पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!