ढाणकी बिटरगाव रस्ता आणखीन किती घेणार बळी

youtube

ढाणकी बिटरगाव रस्ता आणखी किति घेणार बळी,

ढाणकी प्रतिनिधी,  नरवाडे

गेल्या 5 वर्षा पासून समस्त बंदीभागातील अनेक प्राथमिक सोई सुविधा पासून वंचीत असल्यामुळे आम्हाला रस्ते,24तास वीज, पाणी व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, आश्या अनेक समस्या प्रशासनाकडे कागदोपत्री मांडत आहेत परंतु आजपर्यंत आमच्या कोणत्याही तक्रारीची दखल शासनाने घेतली नाही, अशे स्पस्ट वक्तव्य तमाम बंदीभागातील जनतेनी केले आहे, सर्वात महत्वाची बाब म्हणेज दळण वळणासाठी स्वछ सुरळीत रस्ते येकंदरीत 25गावाची बाजारपेठ ढाणकी आहे, आरोग्यसेवा, ढाणकी,,, उच्च शिक्षण ढाणकी उमरखेड, तहसील, न्यायालय, पंचयात समिती उमरखेड ला जावेच लागते, परंतु रस्ते खड्डेमय असल्यामुळे ढाणकी ते बिटरगाव रस्त्यावर आनेक अपघात झाले आहेत आणि होत आहेत, त्यातील एक थरारनाक अपघात असा झाला एक गरोदर माता प्रस्तुतुसाठी ढाणकी रुग्णालयात नेत असताना रस्त्याच्या खड्ड्यामुळे बाळाचा मृत्यू आईच्या पोटातच झाला, आणि त्यानंतर आई सुद्धा मरण पावली, ही घटना सर्वीकडे वाऱ्यासारखी पसरली तरीही प्रशासनाला लाज वाटली नाही, रस्ता रोखो आंदोलनही केले प्रत्येक आंदोलनात सर्व बंदीभागातील जनता उपस्तित होती, तरीही ढाणकी ते बिटरगाव रस्ता जशास तसा, पावसाळा काही दिवसातच येत आहे पावसाळ्यात खड्डे कोणते रस्ता कोणता हे समजणार नाही त्यामुळे आणखी अपघाताचे प्रमाण वाढणार आहेत, म्हणून आणखी किती बळी घेणार हा रस्ता हा प्रश्न बंदीभागातील जनतेसमोर नेहमी भेडसावत आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकी बिटरगाव रस्ता आणखीन किती घेणार बळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!