ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त उमरखेडमध्ये भव्य मिरवणूक डीजेमुक्त मिरवणुकीत धार्मिक उत्साहाला सामाजिक सलोख्याची जोड  हजारो मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग 

youtube

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त उमरखेडमध्ये भव्य मिरवणूक

डीजेमुक्त मिरवणुकीत धार्मिक उत्साहाला सामाजिक सलोख्याची जोड

हजारो मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

उमरखेड : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव शहरात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त ईद-ए-मिलाद उत्सव समितीच्या वतीने शहरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदाची मिरवणूक डीजेमुक्त ठेवण्यात आल्याने धार्मिक उत्साहासोबतच शांतता, शिस्त, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश उमरखेडकरांना पाहायला मिळाला.
सकाळी ९ वाजता शहरातील हजरत तातार शाह बाबा दर्गा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. विविध मशिदींच्या कमिटीचे पदाधिकारी, मौलवी, ईद-ए-मिलाद उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले. धार्मिक वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीने शहरातील
आठवडी बाजार , शिवाजी वॉर्ड, नाग चौक, संजय गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक आणि सुवर्णपथक मार्ग आदी प्रमुख मार्गांवरून पुढे गेली. मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी पिण्याचे पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ईद-ए-मिलादच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. धार्मिक सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आल्याने या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक झाले.मिरवणूक सुवर्णपथक मार्गे आठवडी बाजार परिसरात पोहोचल्यानंतर पुन्हा हजरत तातार शाह बाबा दर्गा येथे शांततापूर्ण वातावरणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.यंदाच्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे डीजेचा वापर न करता काढण्यात आलेली मिरवणूक. विविध मशिदींचे मौलवी, मागील वर्षीच्या सिरफ कमिटी व यंदाच्या उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली. ध्वनिप्रदूषण टाळत धार्मिक भावना आणि परंपरेला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे समाजामध्ये या निर्णयाचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
धार्मिक उत्सव हा केवळ आनंदाचा नसून समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा असावा, असा आदर्श या डीजेमुक्त मिरवणुकीतून उमरखेड शहराने घालून दिला.
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उमरखेड पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. शहरातील प्रमुख चौक, मिरवणुकीचा मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांच्या दक्षतेमुळे संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली.

3 thoughts on “ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त उमरखेडमध्ये भव्य मिरवणूक डीजेमुक्त मिरवणुकीत धार्मिक उत्साहाला सामाजिक सलोख्याची जोड  हजारो मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग 

  1. Sau khi đọc bài viết này tôi đã thử dùng 888slot và cảm thấy trải nghiệm thực tế khá tốt như mô tả. TONY09-18

  2. Hi there! I ould have sworn I’ve been too tthis bblog before bbut aftwr cuecking through sone oof tthe posst I reaized
    it’s nnew tto me. Anyways, I’m definitely gllad I
    founmd iit and I’ll bbe bookmjarking andd checking
    baack often! xnxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!