शुल्लक कारणातून पोटच्या मुलाने केला बापाचं खून

youtube

शुल्लक कारणातून पोटच्या मुलाने केला बापाचं खून :

उमरखेड :.

उमरखेड तालुक्यातील कैलासनगर बेलखेड येथील पोटच्या मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना दि 21 मार्च रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे .
उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कैलासनगर बेलखेड येथील रहिवासी संजय तुकाराम राठोड वय 45 वर्ष यांची पोटच्या मुलानेच घरगुती वादातून सुरीने मानेवर वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि 21 मार्च रात्री राहत्या घरी घडली .
मिळालेल्या माहितीनुसार संजय तुकाराम राठोड यांचा मुलगा राहुल संजय राठोड वय 25 वर्ष यांनी आपण मला मोटरसायकल चालवायला का देत नाही म्हणून या शुल्लक कारणावरून मी तुमचा पोटचा मुलगा नाही आहे का ? तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही लहान् मुलगा अतुल यांच्यावरच तुम्ही खूप प्रेम करता व त्यालाच मोटर सायकल चालवायला देता या शुल्लक कारणावरून वाद विवाद निर्माण झाल्याने मुलगा राहुल यांनी रागाच्या भरात घरातील भाजी कापण्याचे ( सुरी ) अवजाराने वडिलांच्या मानेवर वार केल्याने वडील संजय राठोड गंभीररित्या जखमी झाले . रक्तबंबाळ संजय राठोड यास त्या क्षणी काही गावकऱ्यांच्या सहकार्याने व नातेवाईकांच्या सहकार्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे भरती करण्यात आले पण उपचारादरम्यान संजय तुकाराम राठोड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
घटनेची तक्रार फिर्यादी मूर्तकाची पत्नी आशाबाई संजय राठोड यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिली मारेकरी मुलास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला . प्राथमिक तपास उप पोलीस निरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांनी केला तर पुढील तपास पोलीस अधीक्षक पवन बनसोड .
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी ,पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय प्रशांत देशमुख करीत आहे . .

Google Ad
Google Ad

2 thoughts on “शुल्लक कारणातून पोटच्या मुलाने केला बापाचं खून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!