एमपीएससीच्या त्या413 अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त करा.

youtube

एमपीएससीच्या त्या 413 अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्त करा

*एसआयवो विद्यार्थी संघटनेची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी*

प्रतिनिधी
उमरखेड -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदांसाठी घेण्यात आली होती या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून एक वर्ष होत आले आहे तरी अध्याप राज्य सरकार या उपजिल्हाधिकारी पोलिस उपअधीक्षक तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्या च्या अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे .मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात चालढकल केली जात . असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे .

विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट व मेहनत घेऊन 5 सहा वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले .बहुतांशाचे आई वडील शेतकरी, शेतमजूर ,कामगार असे आहेत . आज देशात शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्या मुलांनी काबाड कष्ट करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी जीवाचे रान करून अभ्यास केले आणि उपजिल्हाधिकारी पोलिस उपअधीक्षक तहसीलदार अशा पदासाठी निवडले गेले तरी शासन त्यांना नियुक्ती देत नाही आणि ते प्रचंड आर्थिक सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जात आहे .

या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिला आहे त्यामुळे आपणास निवेदन देण्यात येत आहे की या बाबतीत विशेष लक्ष देऊन सर्वसमावेशक विचार करून कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ नये म्हणून तात्काळ नियुक्त्या द्याव्या अशा मागणीचे निवेदन स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया ( एस आय वो )या विद्यार्थी संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले .

निवेदन देतांना स्थानिक अध्यक्ष फराज हुसेन, मो . नजीब, अ . रहेमान ,मो . अबुजर , असिम अली, आमिरूल मुजाहीद, मो .आवेज आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

 

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!